Thursday, April 29, 2021

मनपा आरोग्यविभागाच्या मार्फत देण्यात येणाऱ्या कोविड लसीकरणाच्या वितरणबाबत माजी महापौर भगवान फुलसौदर यांचे मनपा आयुक्तांना निवेदन


 

मनपा आरोग्यविभागाच्या मार्फत देण्यात येणाऱ्या कोविड लसीकरणाच्या वितरणबाबत माजी महापौर भगवान फुलसौदर यांचे मनपा आयुक्तांना निवेदन 


नगर - मनपाच्या आरोग्यविभागाच्या वतीने शहरातील विविध आरोग्य केंद्रावर मोफत लस देण्यात येत आहे .त्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत असून त्या  ठिकाणी मोठा गोंधळ उडत असल्याचे पहावयास मिळत आहे . कोणत्या दिवशी कोणती लस द्यावयाची कॅव्हॅक्सिन - कोविशील्ड याबाबत कोठेही सूचना फलक नाहीत .अनेक जेष्ठ नागरिक लस घेण्यासाठी  सकाळ पासून त्या आरोग्य केंद्रावर रांगा लावत आहेत .त्याचा नंबर जवळ आल्यावर त्यांना सांगण्यात येते कि आज लस शिल्लक नाही .त्यामुळे नाहक मनस्ताप व येथील कर्मचारी बाबत  तक्रारी होतात.  तरी संबंधिताना खालील सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी माजी महापौर भगवान  फुलसौदर यांनी केली आहे 

१) सर्व केंद्रावर जेष्ठ नागरिकांसाठी मंडप व्यवस्था करण्यात यावी 

२ रोजच्या रोज किती लसीची वितरण होणार याची माहिती सूचना फलकावर लावावी 

३) कोणत्या दिवशी १ ला डोस व २ रा डोस देणार याची माहिती द्यावी 

४) सर्व मतदान केंद्रावर सामाजिक संस्थाच्या मदतीने लसीकरण केंद्र सुरु करावीत 

५) जास्तीत जास्त लस उपलब्ध करण्यात यावी 

या बाबत सर्व माहिती रोजच्या रोज सूचना फलकावर देण्यात यावी यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही व सर्व नागरिकांना लस मिळेल असे भगवान  फुलसौदर  यांनी म्हटले आहे 

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only