Thursday, April 15, 2021

तात्काळ अटक करा माजी पालकमंत्री राम शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

 


राहुरी तालुक्यातील पत्रकार रोहिदास दातीर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार ला तात्काळ अटक करा माजी पालकमंत्री राम शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन


राजकीय दबावापोटी पोलिसांचा तपास संशयास्पद..!अहमदनगर- राहुरी तालुक्या मध्ये काही दिवसांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जनता भयभीत झाली आहे. या तालुक्यामध्ये यापूर्वी चार खून झाले असून आत्तापर्यंत त्या खुनाचा तपास लागला नाही आरोपी हे मोकाट फिरत आहे. पत्रकार रोहिदास दातीर यांनी वेळोवेळी राहुरी पोलीस स्टेशनला संरक्षणाची मागणी केली होती परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचे पोलीस संरक्षण दिले गेले नाही त्यांच्या अपहरण झाल्यानंतरही त्यांच्या पत्नीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपींना अटक करावी अशी मागणी केली होती परंतु पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे पत्रकार रोहिदास दातीर यांचा जीव गेला. आता राजकीय दबावापोटी पोलिसांचा तपास हा संशयास्पद असून हा तपास स्थानिक गुन्हे शाखा किंवा सीआयडी कडे वर्ग करावा तसेच तपासात असलेल्या आत्ताचे पोलीस निरीक्षक यांचे तात्काळ बदली करावी व तपास यंत्रणेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करावे लवकरच दातीर कुटुंबियांना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस हे भेट देणार घेणार. पोलिस प्रशासनाच्या वतीने तपास करताना सायबर सेल व संबंधित आरोपींचा सीडीआर तपासावा जेणेकरून या हत्याकांडा मागे मुख्य सूत्रधार समोर येण्यास मदत होईल, आज दातीर कुटुंबियांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असून पोलीस प्रशासनाची तपासामध्ये असलेली भूमिका संशयास्पद आहे असा एकंदरीत समोर येत आहे. अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आले यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भाजपचे जिल्हा अध्यक्ष आरुण मुंडे, नगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंदे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाला सांगितले की, तपास हा योग्य दिशेने सुरू असून यामधील आरोपींना अटक करण्यात आलेली असून यामागील मुख्य सूत्रधार व मुख्य आरोपीला अटक करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. राहुरीचे तात्कालीन सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक यांची चौकशी करण्यात येईल कारण रोहिदास दातीर यांनी मागितलेले पोलीस संरक्षण का दिले नाही या प्रकरणामध्ये चौकशी होणार तसेच या खून प्रकरणातील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.


चौकट- तनपुरे म्हणतात की मी कधी कोणाला झापड मारली नाही, परंतु दुसऱ्याकडून झापड मारून घेण्यात त्यांच्या कुटुंबियांची परंपरा आहे.असा आरोप माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केला

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only