Thursday, April 22, 2021

सिव्हील हॉस्पीटलमध्ये दोन दिवसात होणार ऑक्सिजन निर्मिती : मंत्री प्राजक्त तनपुरे

 


सिव्हील हॉस्पीटलमध्ये दोन दिवसात होणार ऑक्सिजन निर्मिती : मंत्री प्राजक्त तनपुरे


। नगर । दि.21 एप्रिल । जिल्हा रूग्णालयात हवेतून ऑक्सिजन तयार करण्याच्या प्लँटचे काम अंतिम टप्प्यात असून, दोन दिवसात तो कार्यान्वित होईल. याची क्षमता जरी जास्त नसली तरी सध्या जो ऑक्सिजनसाठी भार येत आहे, तो यामुळे हलका होईल, अशी माहिती राज्याचे नगरविकास व उर्जा खात्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.


जिल्ह्याची एकूण परिस्थिती, ऑक्सिजनचा तुटवडा, अन्न व औषध खात्याचा कारभार, रूग्णालयाना ऑक्सिजन प्लँट उभारण्यासाठी येणार्या अडचणी आदी विषयांवर ‘यांनी त्यांच्याशी संवाद साधला. . सध्याची परिस्थिती अत्यंत कठीण असून, यामधून वाचण्यासाठी प्रादुर्भाव रोखणे हा सर्वात मोठा उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.


यासाठी जनतेने सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ना. तनपुरे म्हणाले, जिल्हा रूग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्लँट सुरू करता येईल का, याची चाचपणी सुरू होती. त्यानुसार प्रयत्न झाले. आता या प्लँटचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन दिवसात तो प्रत्यक्ष कार्यान्वित होईल. त्यातून आपल्याला ऑक्सिजन उपलब्ध होईल. याची क्षमता जरी जास्त नसली तरी ऑक्सिजन अभावी जी धावाधाव आपली झाली, यापुढे तसे होऊ नये यासाठी हा प्लँट उपयोगी ठरू शकतो. ऑक्सिजनचा सध्या जो लोड आलेला आहे, तो भार काहीसा हलका होईल.


मंगळवारी जिल्ह्यात सर्वत्रच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. त्यासाठी पुण्याहून टँकर यावा यासाठी आम्ही सर्वच प्रयत्नात होतो. त्यावेळी पक्ष, राजकारण हा कोणताच विषय नव्हता. ना. बाळासाहेब थोरात, मी स्वतः, खा. डॉ. सुजय विखे, आ. रोहित पवार आम्ही सर्वांनी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. नगरकडे निघालेला टँकर परत पुण्याला नेण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो, आ. रोहित पवार मुख्य सचिवांशी बोलले. टँकर वेळेत न गेल्यास काय परिस्थिती ओढवू शकते, याची माहिती त्यांना दिली. ना. थोरात यांनीही त्यासाठी प्रयत्न केले. खा. विखे देखील प्रयत्नात होते.


या सर्व प्रयत्नांमुळे ऑक्सिजनचा टँकर त्यावेळी नगरला आला. ऑक्सिजनचा तुटवडा फक्त नगरसाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यातच ही परिस्थिती आहे. प्रत्यक्ष उत्पादन आणि मागणी यात मोठी तफावत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांशी संपर्क साधल्यानंतर बाहेरच्या राज्यातूनही ऑक्सिजन उपलब्ध झाला. यावेळी रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. मात्र आता सर्वच राज्यात रूग्ण वाढू लागल्याने ऑक्सिजनची व्यवस्था आपल्याला आपल्याच राज्यात कशी करता येईल, या दिशेनेही प्रयत्न सुरू झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन निधी, जिल्हा नियोजन निधी यातून पैसा उपलब्ध करून ठिकठिकाणी हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचे प्लँट उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मी स्वतः उर्जा खात्याच्या अधिकार्यांच्या बैठका घेतल्या आहेत. विजनिर्मिती प्रकल्पाजवळ असे काही प्रकल्प आहेत. तो ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी वळविण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र त्यासाठी सिलेंडर व इतर यंत्रणा नसल्याने या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी काहीसा वेळ लागणार आहे. त्यासाठी अधिकार्यांचे पथक कार्यरत आहे.


औषध प्रशासन अधिकार्यांवर कारवाई करू

ठराविक पुरवठादाराची शिफारस अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आल्याने येतील इतर पुरवठादारांना ऑक्सिजन मिळू शकला नाही. त्यामुळे नगरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याकडे मंत्री तनपुरे यांचे लक्ष वेधले असता याची त्यांनी गंभीर दखल घेतली. याची चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करू, असे ना. तनपुरे म्हणाले.


नियमांपेक्षा माणसांचे जीव महत्त्वाचे

रूग्णालयांनी ऑक्सिजनची व्यवस्था करावी, असे जिल्हाधिकार्यांनी मध्यंतरी पत्र दिले. रूग्णालयात अशी व्यवस्था करण्यासाठी बांधकाम नियम आडवे येत असल्याचे रूग्णालय चालकांचे म्हणणे असल्याचे नगरविकास राज्यमंत्री असलेले तनपुरे यांच्या निदर्शनास आणले असता, वैद्यकीय व्यावसायिकांची आपण बैठक घेऊ. असे काही नियम आडवे येत आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only