Friday, April 16, 2021

एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनच्या साठा

 


नगर दिनांक 16 प्रतिनिधी


 नगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढ मोट्या प्रमाणावर होत असतानाच दुसरीकडे आता इंजेक्शन याबरोबरच ऑक्सिजन चा तुटवडा जाणवू लागला आहे. अवघा एक दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्यामुळे प्रशासनासमोर आता मोठा पेच निर्माण झालेला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी एमआयडीसी येथील असलेल्या त्यांच्या कंपन्यांना नोटीस पाठवून सर्व ऑक्सिजन ताब्यात घेतला आहे. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शनिवारी नगर जिल्ह्याच्या त्यामुळे अनेक प्रश्नना आता सामोरे जावे लागणार आहे. याबाबत पालकमंत्री काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे


नगर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरात मध्ये रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत चाललेले आहे रुग्णांचा आकडा हात तीन हजाराच्या पार आता झाला आहे. त्यातच रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्हा रुग्णालय व खाजगी दवाखाने सुद्धा होता पूर्ण क्षमतेने रुग्णांनी भरले आहेत चार दिवसापूर्वी खासगी दवाखान्यांमध्ये 80 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते त्याची अंमलबजावणी कमी अधिक प्रमाणामध्ये सध्या पाहायला मिळत आहे.


नगर जिल्ह्यामध्ये इंजेक्शनचा काळा बाजार उजेडात आला होता ,कोतवाली व भिंगार हद्दीमध्ये दोन ठिकाणी कारवाया करण्यात आल्या होत्या जे ब्लॅक करून त्याची विक्री करत होते त्यांना गजाआड करण्यात आले, मात्र भिंगार येथील ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथील रुग्णाचे हाल होत आहे. येथील रुग्णालयातील असलेले रुग्ण जे आहे तर त्याना इतरांना हलवण्याचा घाट सुद्धा घातला जात आहे .अनेक रुग्णांचे नातेवाईक यांनी थेट जिल्हा प्रशासनाकडे धाव घेऊन याची कल्पनासुद्धा मांडलेली आहे.


इंजेक्शन चा साठा हा एकीकडे संपत चालला असताना दुसरीकडे मात्र आता नगर जिल्ह्यामध्ये रुग्ण संख्या वाढत चालल्याने ऑक्सीजन  व वेंटिलेटर चे बेड  उपलब्ध नाही अशी अवस्था झाली आहे ,आज नगर जिल्ह्यामध्ये अवघा एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनच्या साठा शिल्लक असल्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कालच जिल्हाधिकारी भोसले यांनी आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चाही केली होती, त्यातच इंजेक्शनच्या  कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल यासंदर्भात चर्चा सुद्धा झालेली होती पण आता नवा पेच हा ऑक्सिजनच्या निर्माण झालेला आहे त्यांच्या साठी वेळत मिळाला नाही तर अनेक जणांचे हाल होणार आहेत एकीकडे ऑक्सिजनचे बेड मिळाला तयार नाहीतर आता रुग्णालयांना ऑक्सिजन मिळत नाही, अशी बिकट अवस्था नगर जिल्ह्यामध्ये सध्या पाहायला मिळत आहे.


जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे उद्या शनिवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत कोपरगाव शिर्डी येथे ते कोविड सेंटरला भेट देणार आहेत त्याच बरोबरीने जिल्हा प्रशासन समवेत दुपारी बैठकीचे नगर  येथे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहेत त्यातच नागरिकांचे प्रश्न व सध्याची सुरू असलेली गैरसोय हेसुद्धा आव्हान आता प्रशासन समोर उभे ठाकलेले आहेत त्यामुळे पालक मंत्री उद्या काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only