Tuesday, April 20, 2021

नगरमधील खासगी कोवीड हॉस्पीटल व्हेंटीलेटवर ऑक्सिजन संपण्याच्या मार्गावर;

 


नगर दि 20 (प्रतिनिधी)


नगर शहरातील काही खासगी कोवीड हॉस्पीटल असलेला ऑक्सिजनचा साठा संपला आहे. तर काहींचा संपण्याच्या मार्गावर आहे. नगर शहरातील प्रशिक्षित डॉक्टरांनी आठ जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची माहिती दिली दरम्यान जिल्हाधिकारी भोसले यांनी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासंदर्भात त्वरित निर्णय घेतला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.


 खासगी कोवीड हॉस्पीटलचे डाक्टर हतबल झाले आहेत. ऑक्सिजन नसल्याने उपचार करणा-या रुग्णांना कुठेही घेऊन जा अशा विनवण्या खासगी कोवीड हॉस्पीट्लच्या डॉक्टरांनी नातेवाईकांना केल्या आहेत. यामुळे नगर शहरातील स्थिती आणखी गंभीर झाली आहे.


शहरातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने शहरातील करोनाबाधित रुग्णांची स्थिती भयानक झाली आहे. शहरात ऑक्सिजनची 60 टनाची गरज असताना फक्त 30 ते 35 टनच ऑक्सिजन मिळत आहे. जो काल परवा मिळत होता तोही ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागल्याने डॉक्टर चिंतेत आहेत. जिल्हा शासकीय रुगणालयात रात्री १२ पर्यंत पुरेल एवढाच साठा असल्याचे सुत्रांनी सांगितले.


आज दुपारी इंडियन मेडिकल असोसिएशन चे पदाधिकारी तसेच डॉक्टर यांनी आज जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांना सद्य परिस्थितीचा आढावा यावेळी सांगितला आज नगर जिल्ह्यामध्ये अडीच हजार रुग्ण हे ऑक्सिजन वर आहेत ऑक्सिजनचा पुरवठा कमी झालेला आहे अनेक रुग्णांना ऑक्सिजन मिळेल शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहेत त्यामुळे जे रुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार करायचे कसे असा प्रश्न आमच्यासमोर आहे आजच्या दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक आहे आम्ही आता रुग्ण कशा पद्धतीने जगायचे हा ही प्रश्न आहे या सर्व बाबींचा तात्काळ विचार करून आम्हाला त्वरित ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.


अनेक रुग्ण आहे जिल्हा बुलढाणा मध्ये हलविण्यात आलेल्या आहेत असे सुद्धा माहिती मिळालेले आहे मात्र खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे तेथील ऑक्सिजनचा प्रश्न आता अतिशय गंभीर झाला आहे.


रोमन जिल्हाधिकारी भोसले यांनी नगर जिल्ह्यामध्ये काल एकच ऑक्‍सिजनचा टँकर उपलब्ध झालेला आहे ऑक्सिजनचा पुरवठा कमी आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले आज सायंकाळी दोन टँकर ऑक्सिजनचे प्रशासनाकडे उपलब्ध होणार आहेत ते आल्यानंतर तात्काळ तो ऑक्सीजनही आपल्याकडे दिला जाईल पण त्यांच्या औषधांचा साठा संपत आलेला आहे त्यांना तात्काळ जिल्ह्यातून दिला जाईल असेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only