Wednesday, April 28, 2021

अहमदनगर शहर पाणी योजनेच्या मुळानगर पंपींग स्टेशन परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने वीजरात्री ८.३० वाजले पासुन खंडित झालेला आहे.


 


आज दि.२८/०४/२०२१ रोजी सायंकाळी अहमदनगर शहर पाणी योजनेच्या मुळानगर पंपींग स्टेशन  परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने वीज वितरण कंपनी कडून होणारा विज पुरवठा रात्री ८.३० वाजले पासुन खंडित झालेला आहे. 


         वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर पुर्ण क्षमतेने पाणी उपसा पुर्ववत होण्यास किमान तीन ते चार तासांचा अवधी लागणार आहे.

         त्यामुळे शहर पाणी वितरणाच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य होणार नाही.


         त्यामुळे उद्या दि.२९/०४/२०२१ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा . सिद्धार्थ नगर, लाल टाकी, तारकपुर, ख्रिश्चन कॉलनी, दिल्लीगेट, नालेगांव, तोफखाना, चितळेरोड, आनंदी बाजार, माणिक चौक, कापडबाजार, नवीपेठ, 

      तसेच मुकुंद नगर, वाबळे कॉलनी, शिरीन बाग, मोठी मस्जिद, सिआयव्ही कॉलनी, संजोग नगर, दगडी चाळ, दर्गा दायरा, जुने मुकुंद नगर, हिना पार्क, अभिलाषा कॉलनी, नशेमन कॉलनी, नॅशनल कॉलनी, मेहराज मस्जिद, दरबार चौक, कादरी मस्जिद, मरियम मस्जिद, गरीब नवाज मस्जिद, फकीर वाडा, शहाजी कॉलनी, दम बाराह हजारी दर्गा, मुल्ला कॉलनी, पालीका दवाखाना, बजाज कॉलनी, सहारा कॉर्नर, सहारा सिटी, नवीन मुकुंद नगर, गोरव नगर, एरिगेशन ऑफीस, समीर नगर, टॉप अप पेट्रोल पंप समोरील भाग, पंचवटी नगर, गोविंद पुरा, एकता कॉलनी, मिल्लत कॉलनी, इकरा शाळा, खोजा जमात खाना, जिल्हा परिषद शाळा इत्यादी भागासह उपनगर भागास उशीराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

 

       तसेच सध्या मान्सुन पुर्व परिस्थितीत वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने त्याचा शहर पाणी योजनेच्या वीज पुरवठ्यावर पर्यायाने दैनंदिन पाणी उपशावर परिणाम होत आहे.

      तरी वरील सर्व परिस्थीती विचारात घेवुन नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महानगर पालिकेस सहकार्य करावे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only