Friday, April 2, 2021

पोलीस ठाण्याच्या आवारातच संबंधित आरोपीला ब्लेडने वार केल्याची घटना

 


नगर दिनांक 13 प्रतिनिधी झालेल्या घटनेची फिर्याद देण्यासाठी आलेल्या व्यतिवर पोलीस ठाण्याच्या आवारातच संबंधित आरोपीला ब्लेडने वार केल्याची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे .या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद घेण्याचे काम सुरू आहे


 आरोपींमध्ये मुरलीधर काळोखे याचा समावेश आहे


माहिती अशी की, आज सकाळी अकराच्या सुमाराला तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यासाठी साहेबराव काते ते त्या ठिकाणी आलेले होते ्यांच्या दुसर्‍या बाजूला आरोपी सुद्धा याठिकाणी आलेला होता, ठाणे अंमलदार यांच्यासमोर फिर्याद देण्यासाठी साहेबराव बसले असता आरोपीने तोंडामध्ये ब्लेड सारखे धारधार ब्लेड ठेवले व त्याने साहेबराव याच्यावर पोलीस ठाणे अंमलदार समोरच वार केल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये साहेबराव  यांच्यावर तीन ते चार वार केले असून ते जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलिस स्टेशनच्या आवारात हा प्रकार घडल्यामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only