Monday, April 19, 2021

अप्पर पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी

 


नगर दिनांक 19 प्रतिनिधी 


जनता कर्फ्यू जाहीर केल्यानंतर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी नगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाहायला मिळत आहे ,अत्यावश्यक सेवेतील मेडिकल वगळता अकरानंतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सर्वत्र रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत होता, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी आज नगर शहरातून बंदचा आढावा घेतला विनाकारण फिरणारे जे लोक होते त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली अनेक वाहनांवर आज नगर जिल्ह्यामध्ये कारवाई करण्यात आली.


जनता कल्लू जाहीर झाल्यानंतर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. नगर शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जिल्ह्याच्या सीमेजवळ तसेच प्रत्येक चौकाचौकांमध्ये नगर शहरामध्ये नाकाबंदी करण्यात आलेली आहे, प्रत्येक वाहनाची तपासणी पोलिसांच्या मार्फत केली जात आहे, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना  मज्जाव करण्यात आलेला आहे जे विनाकारण फिरत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा पोलिसांनी सुरू केलेल्या आहे ,अनेक जणांकडे लायसन नाही त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जात होती अकरानंतर सर्वत्र फिरण्यास मज्जाव करण्यात आलेला होता तरी विनाकारण काही जण रस्त्यावर दिसून येत होते तसेच शहरातील नवी पेठ,चितळे रोड ,दिल्लीगेट या ठिकाणी भाजी विक्री 11 नंतर  सुरू होती हे लक्षात आल्यानंतर या ठिकाणी कारवाई करण्यात आली.


अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी आज शहरांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, कापड बाजार रोड ,दिल्लीगेट यासह जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या चौकाचौकांमध्ये जाऊन बंद पाहणी केली व पोलिसांकडून त्याचा आढावा सुद्धा घेतला काही नागरिकांना अडवून त्यांना कोण कुठे चालले आहे याची विचारणा सुद्धा केली जात होती अत्यावश्यक सेवा वगळता जल कोणी विनाकारण दिसत असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली


जनता कर्फ्यू सुरु झाला, नगर शहरासह  जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये सर्व व्यवहार सुरू ठेवण्यात आलेले असल्यामुळे नागरिकांची मोठी झुंबड सर्वत्र उडालेली होती .अकरा वाजे पर्यंत खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडलेले होते, अकरानंतर अत्यावश्यक सेवेतील मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते, त्यानंतर रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळालेला होता.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only