Thursday, April 15, 2021

जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक उतरले रस्त्यावर

 नगर दि 15  प्रतिनिधीकोरोना  पार्श्‍वभूमीवर काल पासून राज्यभरात  संचारबंदी लागू केली असताना त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी आज नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रत्यक्षात रस्त्यावर घेऊन वाहनांची तपासणी केली. दरम्यान प्रत्येक चौकाचौकांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.


यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी अजित पाटील, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, आदींसह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते


कोरोना पार्श्वभूमीवर सध्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असतानाच कडक  निर्बंध राज्य सरकारने लागू केले होते, त्यानंतर काल मध्यरात्रीपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. आज नगर शहरामध्ये अनेक नागरिक रस्त्यावर दिसून येत होते, काही जण रुग्णालयांमध्ये तर काहीजण औषध घेण्यासाठी बाहेर पडले होते, आज अनेक ठिकाणी लोक  रस्त्यावर आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी तसेच विचारणा पोलिसांकडून केली जात होती.


नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज रस्त्यावर उतरून संचारबंदी ची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते त्याचा आढावा घेतला, यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना तुम्ही कशासाठी बाहेर पडला आहे, काय कारण आहे, यासह  विविध प्रश्न विचारले ज्यांची उत्तरे सयुक्तिक नवती त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


शहरातील डीएसपी चौक तसेच पत्रकार चौक दिल्लीगेट व कापड बाजार या महत्त्वाच्या ठिकाणी वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी स्वतः दोन्ही अधिकाऱ्यांन पाहणी करून तपासणी सुरू केली . यावेळी ज्या ज्या नागरिकांन

काढण्यात आले होते त्यांनी त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे अथवा इतर बाबी पोलिसांना सांगितल्या ज्यांची खरोखर अडचण आहे त्यांना सोडून देण्यात आले होते मात्र जे मोक्कार हिंडत होते अशा तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर काही ठिकाणी वाहने सुद्धा जप्त करण्यात आले आहे.

चौकट


रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अनेकांना बेड मिळू शकत नाही तो  कसा उपलब्ध व्हावा याकरता उपजिल्हाधिकारी स्तरावर सहा जणांची एक तुकडी तैनात करण्यात आलेले आहे तसेच 24 तास हेल्पलाईन नंबर सुद्धा आम्ही जारी केलेला आहे. आतापर्यंत या ठिकाणी 200 हून अधिक जणांनी चौकशी केलेली आहे, नुसते टेक्निकल चे वापर न करता प्रत्यक्षात कशा पद्धतीने बेड तात्काळ उपलब्ध होईल या प्रकारच्या सूचना आम्ही येथे प्रशासनावर दिले असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच रिसेल इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे ही वस्तुस्थिती आहे त्यासाठी सुद्धा आम्ही स्वतंत्र यंत्रणा उभी केलेली आहे त्यासाठी सुद्धा टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. आतापर्यंत अनेकांनी या ठिकाणी जाऊन चौकशी केलेली आहे े इंजेक्‍शनचा कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल, याची सुद्धा सूचना दिले असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी सांगितले. नगर शहरामध्ये आम्ही आज पाहणी केलेली आहे विनाकारण लोक रस्त्यावर फिरत असल्याचे सुद्धा आढळून आलेल्या आहेत कोणीही घराबाहेर पडू नये व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आव्हान सुद्धा केलेली असताना जर असा प्रकार सातत्याने राहिला तर आम्हाला कडक कारवाई करावी लागेल असा इशाराही जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी दिला.चौकट

कोरोना पार्श्वभूमीवर राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेले आहे त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाणार यासाठी सर्व पोलिस दलाला सूचना देण्यात आलेल्या आहेत कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश सुद्धा आम्ही दिलेले आहेत . शहरांमध्ये लोक विनाकारण सुद्धा पडत आहे ही बाब सुद्धा लक्षात आलेले आहे वास्तविक पाहता तिथे अत्यावश्यक बाबी आहेत त्या घेण्यासाठी फक्त नागरिकांनी बाहेर पडलो पाहिजे जर किराणामाल संपला असेल तर नजीकच्या किराणा व्यापाऱ्याकडून तो घेतला गेला पाहिजे त्यासाठी गावात अथवा येथे येण्याची गरज नाही असेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले जर नागरिकांनी याची गांभीर्याने दखल घेतली नाही ते आम्हाला कडक पावले उचलावी लागतील असा इशारा सुद्धा पाटील यांनी यावेळी दिला.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only