Saturday, April 3, 2021

महिलेवर अत्याचार केल्याची घटना


 


नगर, दि .3 प्रतिनिधी


-नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात 30 वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील पिडीतेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली असून, अन्य एक आरोपी फरार आहे.  दरम्यान या घटनेमुळे नगर तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.


आरोपींमध्ये अक्षय कचरू माळी (राहणार निंबोडी) व आकाश पोटे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर या घटनेतील आरोपी नीलेश पोटे हा फरार आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिडीत महिला कामानिमित्त आष्टी येथून नगर येथे आली होती. काम आटोपल्यानंतर ती पुन्हा गाडीवर आष्टीकडे पुन्हा जात होते. जामखेड रस्त्याने निंबोडी शिवारातून जात असताना हे दोघे बाजूला थांबले होते. त्यावेळी निंबोडी येथील राहणारे तीन जण आले. त्यांनी ती महिला व तिच्या सोबत असणाऱ्याला बाजुच्या शेतामध्ये नेले. तिच्यावर या तीन नराधमांनी सामुहिक अत्याचार केला. तसेच महिलेकडील 9 हजार रूपये काढून घेतले. त्यानंतर पिडीतेने भिंगार कॅम्प पोलिस ठाणे गाठले व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.


या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायबर सेल व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची मदत घेऊन पोलिसांनी आरोपींच्या शोधार्थ २-३ पथके वेगळ्या ठिकाणी पाठवली होती. यामध्ये माळी याला नगर शहरातून अटक केली. तर दुसऱ्या आरोपीला पुणे येथून अटक करण्यात आली आहे.


 पोलिसांनी पिडीतेच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अक्षय माळी (रा. निंबोडी, ता. नगर) याला व आकाश पोटे याला पोलिसांनी अटक केली असून, एक आरोपी फरार आहेत. भिंगार कॅम्प पोलिसांची पथके आरोपीच्या शोधार्थ रवाना करण्यात आली आहेत. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैयसाहेब देशमुख हे करत आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only