Sunday, April 18, 2021

जिल्हा रुग्णालयात तोडफोड

 


जिल्हा रुग्णालयात तोडफोडनगर : कोरोना रुग्णाला योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा जिल्हा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला. रूग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या काचाही फोडल्या. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. 

नगर तालुक्यातील एक कोरोना संसर्ग झालेला रुग्ण जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत होता. आज त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने आणि प्राणवायूची मात्रा कमी झाल्याने रुग्ण दगावला, असा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. रुग्णाच्या नातेवाईकांनी यावरून चांगलाच गोंधळ घातला. काहीनी अतिदक्षता विभागाच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयांमध्ये गोंधळाचे आणि घबराटीचे वातावरण पसरले होते.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only