Thursday, April 22, 2021

हुंडेकरी अपहरण प्रकरणी दोन्ही आरोपींना जन्मठेप

 


हुंडेकरी अपहरण प्रकरणी दोन्ही आरोपींना जन्मठेप


। नगर । दि.21 एप्रिल ।  शहरातील प्रसिध्द उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांच्या अपहरण प्रकरणातील आरोपी अजहर शेख व निहार बाबा शेख यांना दोषी धरुन येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश अशोकुमार भिलारे यांनी जन्मठेप व 10 हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे.. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. अर्जुन पवार यांनी काम पाहिले 


आरोपी  अजहर  मंजूर  शेख  व  निहाल  उर्फ  बाबा  मुशरफ  शेख    यांनी  अब्दुल  करीम  हुंडेकरी  यांचे  18  नोव्हेंबर  2019  रोजी  अपहरण  केले.   नंतर  आरोपींनी  हुंडेकरी  यांच्या  कुटुंबीयांना  फोन  करून  25  लाख  रुपयांची  खंडणी  मागितली.  तेव्हा  18  नोव्हेंबर  2019 रोजीच  फिर्यादी सय्यद अफरोज अब्दुल करीम यांनी तोफखाना पोलीस ठाण्याला फिर्याद दाखल केली होती की, त्यांचे  वडील  हे  नित्य  नियमाप्रमाणे  18  नोव्हेंबर  2019  रोजी पहाटे 5.30 वाजता नमाज पठण करण्यासाठी पायी मा मस्जीद येथे गेले व पुन्हा घरी आले नाहीत. त्यानंतर सकाळी  साधारण  सातच्या  सुमारास  फिर्यादीच्या  आईच्या  मोबाईलवर वडील अब्दुल करीम हुंडेकरी यांचा अनोळखी नंबर असलेल्या मोबाईवरून फोन आला. वडील घाबरलेल्या अवस्थेत होत व दोन तासांत घरी परत येतो असे सांगितले  आणि  फोन  कट  झाला.  त्यानंतर  दोन  तासांनी  परत  फोन  आला  तेव्हाही  वडील  घाबरलेल्या  अवस्थेत  बोलत  होते.  परत  फोन  कट झाला. त्यामुळे आपण तोफखाना पोलीस ठाण्याला फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने वेगवेगळी पथके तयार करून शोध सुरू केला. तेव्हा आरोपी हुंडेकरी यांच्यासह टोलनाक्याजवळ औरंगाबाद-नगर  येणार्‍या  एसटी  बस  पोलिसांनी  तपासली  असता,  त्यात  हुंडेकरी  आढळून  आले.  पोलिसांनी  त्यांना  नगरला  आणून  सविस्तर  माहिती  घेतली.आरोपींनी हुंडेकरी यांना जालना जिल्ह्यात नेले. दरम्यान आर-ोपींनी हुंडेकरी यांना नांदेड जिल्हा हद्दीत 20 ते 25 किलोमीटरपर्यंत घेऊन गेले. तेथे त्यांनी 25 लाखांची खंडणी मागितली. तेव्हा हुंडेकर यांनी 10 लाख रुपये देतो व नंतर उरलेली रक्कम देतो असे आरोपीस सांगितले. आरोपी अजहर मजूद शेख याने खंडणी न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली.


 तेव्हा हुंडेकरी यांनी मी आज संध्याकाळ पर्यंत तुम्हाला 10 लाख रुपये देतो व उर्वरीत रक्कम दोन तीन दिवसात जमा करून देतो. त्यावेळी आरोपींना त्यांच्या बोलण्याचा भरवसा वाटला व त्यांनी हुंडेकरी यांना खंडणीची हमी घेऊन सोडून दिले. त्यानंतर हुंडेकरी यांना  नगरच्या  पोलिसांनी  नगरला  येणार्‍या  एसटी  बसमधून  ताब्यात  घेतले. त्यानंतर पोलिसांनी उपरोक्त दोन्ही आरोपींना अटक केली. सर्व पुरावे गोळा करून व सर्व साक्षीदारांचे जबाब घेऊन पोलिसांनी आरोपी अजहर मंजूर शेख व निहाल उर्फ बाबा मुशरफ शेख यांच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तेव्हा सर्व सुनावणी झाल्यानंतर  उपरोक्त  दोन्ही  आरोपींना  जिल्हा  व  सत्र  न्यायाधीश    मिलारे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  या गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपींचा सहभाग होता. त्यापैकी एक आरोपी फतेह सिद्दिकी अहमद अन्सारी हा अद्याप फरार आहे. तसेच अन्य आरोपी विष्णू सातोनकर हा  बाल  गुन्हेगार  असल्यामुळे  त्याचे  प्रकरण  न्यायप्रविष्ट  आहे.  या  खटल्यामध्ये  सरकार  पक्षातर्फे  अतिरिक्त  सरकारी  वकील  अर्जुन  पवार  यांनी काम पाहिले. त्यांना फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. सतीश गुगळे यांनी साहाय्य केले. खटला चालू असताना पैरवी अधिकारी पोलीस हव-ालदार एम. ए. चोरात व तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मुशाख शेख यांनी सरकारी वकील अर्जुन पवार यांना सहाय्य केले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only