Wednesday, April 28, 2021

वांबोरी घाटामध्ये वाहन चालकांना अडवुन त्यांना लुटणारी टोळी जेरबंद - अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 


वांबोरी घाटामध्ये वाहन चालकांना अडवुन त्यांना लुटणारी टोळी जेरबंद - अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 


अहमदनगर (प्रतिनिधी २८) वांबोरी घाटामध्ये वाहन चालकांना अडवुन त्यांना लुटणारी टोळी जेरबंद - अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 फिर्यादी श्री . रितीक प्रेमचंद छजलानी वय २० वर्ष रा . पंचशीलनगर , भिंगार हे त्याचे मित्रासह गोरक्षानाथ गड , मांजरसुंबा येथे त्यांची मोटार सायकल नंबर एमएच - १६ - सीबी -३३२८ हि वरुन वांबोरी फाटा मार्गे जात असतांना गोरक्षनाथ गडाचे चढावर मोटार सायकलचा वेग कमी झाला त्यावेळी फिर्यादीचे समोरुन दोन व पाठीमागुन दोन असे एकुण ४ अज्ञात इसम दोन मोटार सायकल वरुन फिर्यादी जवळ आले व फिर्यादी व त्याचे मित्रास मारहाण करुन फिर्यादी व त्याचा मित्राजवळील ३ मोबाईल व सोने चांदीचे दागीणे असा एकुण १,१६,५००० / - रु . किमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता . सदर घटने बाबत फिर्यादी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गुरनं . १ २५४/२०२१ , भादवि कलम ३ ९ ४,३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता . सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि श्री . अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर हे त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोनि / श्री . अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि , सदरचा गुन्हा हा विकास हानवत , रा . कात्रड ता . राहुरी याने व त्याचे साथीदाराने मिळुन केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि / सोमनाथ दिवटे , सहाय्यक पोलीस निरीक्षक / मिथुन घुगे , पोसई / गणेश इंगळे , सफौ / नानेकर , पोहेकॉ / हिंगडे , संदिप घोडके , मनोज गोसावी , पोना / सुनिल चव्हाण , संदिप पवार , सुरेश माळी , शंकर चौधरी , लक्ष्मण खोकले , दिपक शिंदे , रविकिरण सोनटक्के , ज्ञानेश्वर शिंदे , विशाल दळवी , पोकॉ / योगेश सातपुते , मच्छिद्र बर्डे , मेघराज कोल्हे , कमलेश पाथरुड , सागर सुलाने , आकाश काळे , रोहीत येमुल व मपोना / भाग्यश्री भिटे तसेच चापोहेकॉ / संभाजी कोतकर , उमांकात गावडे अशांनी मिळून कात्रड ता . राहुरी येथे जावून आरोपीचे ठावठिकाणाबाबत गोपणीय माहिती घेवून आरोपी नामे ( १ ) विकास बाळू हनवत , वय -२४ वर्षे , रा . पाण्याचे टाकी जवळ , कात्रड , ता . राहूरी यास ताब्यात घेतले त्याचेकडे सदर गुन्हया बाबत विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली . त्यास अधिक विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार नामे करण शेलार रा . मोरया चिंचोरे ता . नेवासा , सुरेश निकम रा . कात्रड ता . राहुरी , व दोन अल्पवयीन साथीदार अशांनी मिळुन केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीच्या आधारे आरोपीतांचा शोध घेवुन आरोपी नामे ( २ ) करण नवनाथ शेलार , वय- १ ९ वर्षे , रा . विटभट्टीजवळ , मोरे चिंचोरे , ता . नेवासा व एक अल्पवयीन साथीदार यांना वेगवेगळया ठिकाणावरुन ताब्यात घेतले . तसेच सुरेश निकम व एक अल्पवयीन साथीदार यांचा शोध घेतला पंरतु ते मिळुन आले नाही . ताब्यात घेतलेले आरोपी व अल्पवयीन साथीदार यांचेकडे सदर गुन्हयातील चोरलेल्या मुद्देमाला बाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्हयातील चोरलेले मोबाईल व दागीणे साथीदार सुरेश निकम याचेकडे असल्याचे सांगीतले . ताब्यात घेतलेले आरोपी व अल्पवयीन साथीदार यांना विश्वासात घेवुन त्यांनी आनखी कोठे कोठे गुन्हे केले आहे याबाबत विचारपुस केली असता त्यांनी गजराज नगर , अ.नगर व मोरया चिंचोरे शिवार , ता . नेवासा या परीसरामध्ये वाहन चालकांना अडवुन लुटमार केली असल्याची कबुली दिली आहे . त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नंबर 1 १३२/२०२१ भा.द.वि.कलम ३ ९ ५ व सोनई पोलीस स्टेशन गु.र.नंबर । १३१/२०२१ भा.द.वि.कलम ३ ९ ४,३४ प्रमाणे गुन्हे

दाखल असून वरील नमुद आरोपी व अल्पवयीन साथीदार यांचेकडून चार मोटार सायकली , दोन मोबाईल , रोख रक्कम , गिलवर असा एकूण १,७३,७०० / - रु . किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . वरील नमुद 

आरोपी पौकी  विकास बाळु हानवत हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . १ ) शनिशिंगनापुर पो.स्टे . गु.र.नंबर 1 २६/२०१६ भा.द.वि.कलम ३७ ९ , ३४ २ ) सोनई पो.स्टे . गु.र.नंबर 1१४८/२०२० भा.द.वि.कलम ३ ९ ४,३४ ३ ) सोनई पो.स्टे . गु.र.नंबर 1 ३११/२०२० भा.द.वि.कलम ३ ९ ४,५०६.३४ ४ ) सोनई पो.स्टे . गु.र.नंबर 1५६/२०२० भा.द.वि.कलम ३ ९ ७.३ ९ ४,४२७,५०४,३४ ५ ) एमआयडीसी पो.स्टे . गु.र.नंबर 1 ३ ९ ७ / २०१ ९ भा.द.वि.कलम ३ ९ २,४११,३४ ६ ) एमआयडीसी पो.स्टे . गु.र.नंबर । ८६८/२०२० आम अॅक्ट कलम ४/२५ आरोपींना मुद्देमालासह एमआयडीसी पो.स्टे . येथे हजर करण्यात आले आहे . पुढील कार्यवाही एमआयडीसी

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only