Friday, April 30, 2021

परमविरसिंग यांच्या अंडरवल्ड कनेक्शनची चौकशी व्हावी-पालक मंत्री मुश्रीफ यांची सरकारकडे मागणी

 
नगर दिनांक 30 प्रतिनिधीमाजी गृह मत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भात 100 कोटी बाबत चौकशी केली जाते मात्र परमवीर सिंग यांच्या संदर्भामध्ये एक हजार कोटी रुपयांचा दावा केला जात असताना त्याची चौकशी आता व्हायला पाहिजे. विशेष म्हणजे परमवीर सिंग यांचे अंडरवल्डशी संबंध होते ही पुढे आलेली बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची आता राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे, असे वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले.


येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक झाल्यानंतर ते बोलत होते यावेळी आमदार रोहित पवार, आमदार बबनराव पाचपुते, आमदार लहू कानडे, आमदार किरण लहामटे,  आशुतोष काळे, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले ,, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


यावेळी मुश्रीफ म्हणाले की शंभर कोटी रुपयांच्या संदर्भामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भामध्ये चौकशी होते. मात्र, ज्या परमविर सिंह यांच्या संदर्भामध्ये एक हजार कोटी रुपयांचा आरोप होतो व अकोला येथे गुन्हा दाखल होतो,  त्याची मात्र चौकशी होत नाही. दोन दिवसापूर्वी तक्रार केली त्यामध्ये त्यांनी त्यांचे अंडरवर्ल्ड गुन्हेगारीशी संबंध होते असे म्हटले आहे म्हणून आता या प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी तात्काळ केली पाहिजे असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only