Tuesday, May 4, 2021

नगर जिल्ह्याची परिस्थिती नियंत्रणात-विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर केले कौतुक

 नगर दि 4 प्रतिनिधी


 जिल्हा आणि शहराच्या संदर्भातल्या कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन या ठिकाणची परिस्थिती समजून घेतली असून खाटा उपलब्धता, वेंटिलेटर व सर्व माहिती घेतली असता या ठिकाणी बर्‍यापैकी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे, अशी स्पष्टोक्ती राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.


जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दरेकर यांनी आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, शहराध्यक्ष भैय्या गंधे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


  दरेकर म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा 60 ऐवजी 50 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे, दहा टन मिळत नाही असे सांगण्यात आलेले आहे. इंजेक्शनचा पुरवठा व्हायला पाहिजे व त्याच्यासाठी ज्या कंपन्या आहेत, त्यांच्याशी बोलून जास्तीत जास्त नगरला  गोष्टी कशा उपलब्ध होतील याची निश्चितपणे काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले. आज आमदार ,आमचे जिल्हाध्यक्ष, महापौर या सगळ्या प्रतिनिधींसमवेत एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका सुद्धा घेतलेली आहे, असे सांगून ते म्हणाले, माझ्याकडे रुग्ण व बेडचा आकडा आहे, त्याप्रमाणे केअर सेंटर ,डेडिकेटेड कोविड सेंटर,याठिकाणी ऑक्सिजन यांची उपलब्धता आहे. कोणत्या ठिकाणी बेड नसतील तर आपण मला दाखवून द्या  आणि आपण जे सांगताय तशा प्रकारचे नसतील तर निश्चितपणे शासनाला विचारू, असे ते म्हणाले.


जिल्हा रुग्णालयांमध्ये 283 लोकांवर उपचार ठिकाणी केले जातात. त्या ठिकाणी त्यांनी एक्सटेन्शन करून बेडची 550 ची कॅपॅसिटी केली आहे आणि त्या ठिकाणी यंत्रणा उपलब्ध आहेत. आज खाजगी हॉस्पिटलला ऑक्सिजन व इंजेक्शनचाचा प्रॉब्लेम आहे, पण शासकीय रुग्णालयांमध्ये सर्व सोयी उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले.


राजकारण करू नये


राज्य सरकार केंद्रावर टीका करते या संदर्भात विचारले असता, हे दुर्दैव आहे. अशा संकटाच्या काळात कोणीच राजकारण करता कामा नये. राज्य सरकारने एकत्रित काम केले पाहिजे व आम्ही पण केले पाहिजे, परंतु या ठिकाणी प्रत्येक वेळेला आपले अपयश झाकण्यासाठी कुठल्याही गोष्टीत केंद्रावर टीका करणे बरोबर नाही. जर ऑक्सीजन चा साठा सतराशे पन्नास मे टन मिळत असेल तसेच देशात सगळ्यात जास्त लस  आपल्याला 4 लाख 35 हजार मिळत असतील आणि एवढ्या मिळूनसुद्धा केंद्रावर प्रत्येक गोष्टीला जबाबदार धरणे चुकीचे आहे. लसीकरण सगळ्यात जास्त महाराष्ट्राने केले आहे व लसी उपलब्ध झाल्या म्हणून केलं ना, असा सवाल करून ते म्हणाले, त्यामुळे जी गोष्ट केंद्राकडून मिळते, त्या संदर्भात मिळत असताना पण टीका करणे योग्य नाही. राज्याची पण जबाबदारी आहे पण जेवढे आपण समन्वय साधू व जेवढे केंद्राशी सलोख्याचे वातावरण ठेवून तेवढ्या जास्त सुविधा आपल्याला उपलब्ध होईल, परंतु या ठिकाणी आपल्या यंत्रणा सक्षम करण्यात आपण कमी पडलो म्हणून केंद्रावर बोट दाखवणे सुद्धा बरोबर नाही, असे ते म्हणाले.

अभिनेत्री कंगना राणावत यांचे ट्विटर अकाउंट बंद केल्याच्या घटनेबद्दल ते म्हणाले,  या संदर्भात नेमका कशासाठी अकाउंट त्यांचं सस्पेंड केलं, याची या क्षणाला मला माहिती नाही. कोणी केलं व कशासाठी केलं, कारण काय हे माहीत झाल्यावर यावर बोलणे उचित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


शासनाविरोधात निकाल


पंढरपूर पोटनिवडणूक निकालाबाबत ते म्हणाले, महाराष्ट्रात असा अपवाद आहे. एखाद्या घरामधला एखादा लोकप्रतिनिधी जातो, तेव्हा आत्तापर्यंत एखादी अपवादात्मक केस असेल तिथे दुसरा निवडून येतो, परंतु लोकांनी भावनिक वातावरणापेक्षा महाराष्ट्रमधल्या विकास आणि सध्याची स्थिती आहे, त्यावषयी नकारात्मक मतदान त्या ठिकाणी केले, असा दावा त्यांनी केला.


नातेवाईकांना सांगू नकाइंजेक्शन खासगी हॉस्पिटलमध्ये मिळत नसल्याबाबत ते म्हणाले, मी जिल्हाधिकारी व आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत. अशा प्रकारे रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडीसिविर  आणायला सांगू नका. कारण मोठ्या हॉस्पिटल इंजेक्शन साठा दिले आहेत, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सिव्हिल सर्जन यांच्याकडे जिल्हा रुग्णालयात साठा आहे परंतु  रुग्णांच्या नातेवाइकांना सांगणारे मोकळे होतात आणि मग आलेला साठा जातात कुठे, असा प्रश्न निर्माण होतो..त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून मला वाटते आता यंत्रणेद्वारे त्या दृष्टीने कार्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only