Sunday, May 23, 2021

मुयकरमायक्रोसिस अहमदनगरमध्ये 102 रुग्ण

 नगर दिनांक 22 प्रतिनिधी 

कोरोना रुग्ण आता बरा होत असताना नव्याने म्हणजेच  मुयकरमायक्रोसिस आजाराने आता रुग्ण वाढू लागले आहे. नगर शहरामध्ये अठरा रुग्णालयांमध्ये सुमारे 102 रुग्ण सध्या उपचार घेत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये ही संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान नगर जिल्ह्यामध्ये जे काही  रुग्ण आढळून आले आहे तसेच शहरामध्ये जे रुग्ण वाढत चाललेले आहे त्यांना तात्काळ इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही राज्यस्तरावर प्रयत्न करत असल्याचे महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले आहे. दरम्यान या आजारात संदर्भामध्येे राज्य शासनाने महात्मामा फुले आरोग्य योजनेमध्येे याचा समावेश केलेला आहे जर त्यांना उपचार या योजनेमध्य नाकारले तर अशा रुग्णालयावर निश्चितपणे कारवाई केली जाईल असेही आयुक्त यांनी सांगितले.मुयकरमायक्रोसिस आजाराची लक्षणे ही आता मोठ्या प्रमाणात जाणवू लागलेली आहे, जे रुग्ण कोरोनातून बरे झालेले आहे त्यांना याची लक्षणे आता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. नगर शहरामध्ये 102 रुग्ण शहरातील अशा विविध खासगी रुग्णालयांमध्ये सध्या उपचार घेत आहे. त्यांची परिस्थिती अतिशय भयानक अशी होत चाललेली आहे ,काहीना नाक, डोळे गमावण्याची वेळ आली तर काहींना अन्य आजारांची सुद्धा लक्षणे  आता दिसू लागले आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत गेली तर त्यांच्यावर तात्काळ इलाज कशा पद्धतीने होईल यासाठी आता विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.


मुयकरमायक्रोसिस या रुग्णांना  नगरच्या जिल्हा रुग्णालयातून इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे ,मात्र त्यांची संख्या अतिशय नगण्य असल्यामुळे इंजेक्शन तात्काळ मिळावे अशी मागणीसुद्धा आता मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालय बाहेर जाऊन तासन्तास त्यासाठी उभे राहावे लागत आहे. जेवढा साठा आहे तेवढ्या पद्धतीने सध्या इंजेक्शन दिले जात आहे मात्र आता रुग्ण संख्या वाढत चालल्यामुळे इंजेक्शनची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे त्यातच केंद्र सरकारने आता हा साथीचा आजार आहे त्यामुळे संबंधित रुग्ण संख्या आपल्या जिल्ह्यामध्ये किती आहे व त्यांच्यावर कशा पद्धतीने उपचार चालू आहेत त्याची माहिती सुद्धा सध्या स्थानिक प्रशासनाकडून मागण्यास सुरुवात केलेली आहे तसेच राज्य सरकारने सुद्धा या आजाराच्या संदर्भात कुठे उपचार सुरू आहेत तसेच खासगी रुग्णालयांमध्ये किती जणांवर उपचार सुरू आहेत यासह विविध प्रकारची माहिती सुद्धा राज्य सरकारने मागवली आहे.कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर आता या आजाराची लक्षणे वाढत चालल्यामुळे नगर शहरामध्ये चार दिवसापूर्वी 40 रुग्ण होते आता त्यानंतर रुग्णसंख्या  झपाट्याने वाढत असल्यामुळे आता तो आकडा 102 च्या घरामध्ये गेलेला आहे या आजारामुळे एक जणांचा नगर शहरामध्ये मृत्यू पण झालेला आहे.


या संदर्भामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त शंकर मोरे यांनी आम्हाला केंद्र व राज्य सरकारने या आजाराच्या संदर्भामध्ये माहिती मागविली आहे. आम्ही एकत्रितपणे ती माहिती आज शासनाकडे सादर करणार आहोत राज्य शासनाने सुद्धा या संदर्भामध्ये माहिती मागवली असून ती आम्ही त्यांना पाठवत आहे. नगर शहरामध्ये रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे,  जास्त इंजेक्शन लागणार आहे ते तात्काळ उपलब्ध कशा पद्धतीने होईल याचे नियोजन सुरू आहे ,आम्ही सुद्धा इंजेक्शनच्या संदर्भामध्ये वाढीव इंजेक्शन मिळावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्यांनी रेमडीसीविर इंजेक्शन घेतले आहेत व जे रुग्ण  बरे झालेले आहेत अशांनी घरीच योग्य ती काळजी घेतली पाहिजे, घरामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे, आपले नाक, कान, डोळे हेसुद्धा आपण तपासून घेतले पाहिजे तसेच मास्कचा वापर करताना योग्य ती खबरदारी त्यांनी सुद्धा घेतली पाहिजे ,या सर्व गोष्टीचे तंतोतंत पालन त्यांनी केले पाहिजे. ज्या रुग्णांना त्रास होत असेल त्यांनी तात्काळ संबंधित  रुग्णालयात जाऊन   तात्काळ उपचार घ्यावेत असे सुद्धा आयुक्त गोरे यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने या आजाराचा महात्मा फुले योजनेमध्ये समावेश केलेला आहे जर एखाद्या रुग्णालयात या योजनेमध्ये त्याला उपचार देत नसेल तर निश्चितपणे त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असेही आयुक्त गोरे यांनी यावेळी सांगितले.


चौकट


नगर शहरामध्ये खाजगी रुग्णालयांमध्ये या आजारपणाचे रुग्ण उपचार घेत आहे. त्याची एकत्रित माहिती दररोज आमच्या पथकाकडून घेतली जात आहे, त्या ठिकाणी आम्ही सर्व प्रकारची माहिती व त्यांची उपचाराची पद्धती सुद्धा आम्ही तपासत आहे. रुग्णांना इंजेक्शन मिळण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहेत असे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी सांगितले


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only