Friday, May 7, 2021

सोन्याचे दागिणे, वाहन, मोबाईल व हत्यारे जप्त,20,40,500रु मुद्देमाल सह आरोपी जेरबंद

 जनार्धन काळे, १ अल्पवयीन व ईतर ३ आरोपी यांनी दरोडा घालुन त्यामधिल मुद्देमाल कांचन एवन काळे, रा.चिखली, ता.आष्टी, आरोपी मणिषा एवन काळे व एवन हैवान काळे यांनी त्यांचे राहते घरात लपवुन ठेवला असल्याची माहिती दिली.


सदर आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिणे व ईतर चोरीतील सोन्याचे दागिणे असा एकुण ३० तोळे १५,००,०००/- रु (पंधरा लाख रुपये )किं.चे सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत. तसेच आरोपीच्या घरातुन एक रामपूरी चाकू, लोखंडी कटावनी, ३०,०००/- रु किं.चे ३ वेगवेगळ्या कंपण्यांचे मोबाईल हॅन्डसेट, ५,००,०००/-रु. किं. ची स्कार्पिओ जिप नं. एमएच-१७-एजे-३५९८ व रोख रक्कम १०५००/- रुपये असा एकूण २०,४०,५०० /-रु. (वीस लाख चाळीस हजार पाचशे रु) किं. चे सोन्याचे दागिणे, वाहन, मोबाईल व हत्यारे जप्त करण्यात आलेले आहेत.


वरील नमुद आरोपीमधिल एवन हैवान काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द यापुर्वी अंभोरा पो.स्टे. जि. बीड येथे गुरनं. १५१/२०१७, भादवि कलम ३९५ सह मोक्का कायदा कलम ३ (१)(ii), ३(२), ३(४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे..


सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटिल साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. आणासाहेब साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, कर्जत विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर व कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तरित्या केलेली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोसई / अमरजित मोरे, कर्जत पोलीस स्टेशन हे करत


आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only