Thursday, May 27, 2021

महिलेस मारहाण करून केले लज्जा उत्पन्न होईल असे कृत्यमहिलेस मारहाण करून केले लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य


अहमदनगर । २७ मे २०२१


नगर तालुक्यातील बारादरी येथील 45 वर्षीय महिलेस मारहाण करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची घटना घडली आहे. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात भादंवि. कलम 354, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणिक भानुदास पोटे (रा. बारादरी, ता. जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, की गुरूवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास 45 वर्षीय पिडीत महिला गोठ्यामध्ये झाडलोट करत होती. त्यावेळी आरोपी माणिक पोटे याच्या मोटारीचे पाणी गोठ्यामध्ये आले असता पिडीत महिलेने गोठ्यामध्ये पाणी येवू देवू नका असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपी माणिक पोटे याने पिडीत महिलेस शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पिडीतेचे कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यासंदर्भात सकाळी दहा वाजता पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी माणिक पोटे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोना. पालवे करत आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only