Sunday, May 23, 2021

अहमदनगर शहरात उद्या पासून लसीकरण सुरू करणार
 नगर दिनांक 22 प्रतिनिधी


सध्या लसीचा साठा हा गेल्या दोन दिवसापासून नगर शहरामध्ये न आल्यामुळे लसीकरण बंद आहे. आज रात्री उशिरा ने साठा आल्यानंतर जे  45वर्षाच्या पुढे व्यक्ती ज्या  फ्रंटलाईन मध्ये काम करत आहे अशांना दुसरा डोस उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी दिली आहे तसेच नगर शहरामध्ये लसीचा साठा उपलब्ध झाला तर उपकेंद्र सुद्धा वाढवण्यात येतील त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने तयारीही सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.


आतापर्यंत नगर शहरांमध्ये 75 हजार लोकांना लसीकरण करण्यात आलेले आहे कोवाक्सची व कोविशील  असे दोन्ही प्रकारचे लसीचे डोस देण्यात आलेले आहेत काहींचे दोन डोस पूर्ण झाले आहे तर काहींचे पहिले डोस  दिलेला आहे नगर शहराची लोकसंख्या विचारात घेता सर्वांना लसीकरण केले पाहिजे हे जरी असले तरी दुसरीकडे डोस कमी प्रमाणामध्ये मिळत असल्यामुळे सध्या फक्त महानगरपालिकेच्या केंद्रामध्ये ते डोस दिले जात आहे. अनेक नगरसेवकांची तसेच इतरांची मागणी आहे की आमच्या भागामध्ये उपकेंद्र द्यावेत उपकेंद्र देण्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे मात्र लसीचा साठा त्याप्रमाणात येत नाही त्यामुळे उपकेंद्र वाढवता येत नाही आत्तापर्यंत आम्ही तिन उपकेंद्र सुरू केलेले आहे. येत्या काही दिवसांमध्ये जर  साठा आम्हाला उपलब्ध झाला तर नगर शहरामध्ये आम्ही उपकेंद्र देण्यास सुरुवात करणार असल्याचे डॉक्टर बोरगे यांनी यावेळी सांगितले.


आज रात्री आम्हाला लसीचा साठा उपलब्ध होईल त्यानंतर उद्या म्हणजे सोमवारी आम्ही 45 वर्षाच्या पुढे जे फ्रन्टलाइन वर्कर आहेत त्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे त्याचे नियोजन सुद्धा केले असल्याचे त्यांनी सांगितले.


ज्यांना कोरोना झालेला आहे व त्यातून ते बरे झालेले आहेत अशांना लस केव्हा व कधी घ्यायची या संदर्भामध्ये केंद्र सरकारने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशानुसार  त्यांना त्याचे पालन करावे लागणार आहे त्यांनी साधारण नव्वद दिवसानंतरच डोस घेतला पाहिजे असे म्हणलेले आहे त्यामुळे त्या रुग्णांनी त्याच वेळेला लसीकरण करून घ्यावे असेही त्यांनी म्हटले आहे तसेच लसी संदर्भामध्ये केंद्र सरकारने दोन्ही लस च्या संदर्भामध्ये जे काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असेही डॉक्टर बोरगे यांनी  म्हटले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only