Tuesday, May 4, 2021

शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील लाचेची मागणी करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यां निलंबनाची कारवाई

 



शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील लाचेची मागणी करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी निलंबन केले आहे. 


वाळूच्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी पंचांसमोर करण्यात आल्याने तीन पोलिस कर्मचार्‍यांच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.


शेवगाव तालुक्यामध्ये वाळूचे ट्रक पकडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई न करता सोडून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तीन पोलिस कॉन्स्टेबलच्या विरोधात लाललुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुन्हा नोंदवला. 


वसंत कान्हु फुलमाळी (राहणार शंकर नगर, पाथर्डी), संदिप वसंत चव्हाण (राहणार पोलिस वसाहत शेवगाव, जि. नगर), कैलास नारायण पवार (राहणार शंकर नगर, पाथर्डी) अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावे आहेत.


यातील तक्रारदार यांची वाळूची ट्रक उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुदर्शन मुंढे यांच्या पथकात असलेल्या या तिघा पोलिसांनी 7 एप्रिल रोजी पकडली. त्या ट्रकवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात व वाळू वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी हप्ता म्हणून पैशांची मागणी करण्यात आली. 7 एप्रिल रोजी आयोजित लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान तिन्ही आरोपी यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 15 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती.

त्यानुसार आरोपीच्या विरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात येथे गुन्हा दाखल केला असून, हे तिन्ही आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only