Saturday, May 8, 2021

विशेष पथकातील तीन पोलीस कर्मचार्‍यांविरूद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी उपअधीक्षक मुंढे यांची लाचलुचपत विभागाने कार्यालयात बोलवून चौकशी
 अहमदनगर ,शेवगावचे उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या विशेष पथकातील तीन पोलीस कर्मचार्‍यांविरूद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी उपअधीक्षक मुंढे यांची लाचलुचपत विभागाने कार्यालयात बोलवून चौकशी केली असल्याची माहिती उपअधीक्षक हरीष खेडकर यांनी दिली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचारी पसार झाले आहेत. त्यांच्या अटकेनंतर तपासाला गती मिळेल, असेही उपअधीक्षक खेडकर यांनी सांगितले.

एक वाळूची वाहतूक करणारी ट्रक उपअधीक्षक मुंढे यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकातील वसंत फुलमाळी, संदिप चव्हाण, कैलास पवार यांनी 7 एप्रिल रोजी पकडली होती. ती ट्रक कारवाई न करता सोडून देण्यासाठी आणि पुढे हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी या पोलिसांनी कंत्राटदाराकडे केली. मात्र, कंत्राटदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाने केलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान वरील नमूद तिन्ही पोलिसांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 15 हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. लाच मागितल्याचा पुरावा एसीबीच्या अधिकार्‍यांना मिळाल्यानंतर त्यांनी  शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर हे पोलीस कर्मचारी पसार झाले आहेत. लाचलुचपत विभागाकडून त्यांचा शोध सुरू आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only