Saturday, May 8, 2021

पोलिसांनी केली चाचणीला सुरुवात

 
नगर दिनांक 8 प्रतिनिधी


नगर शहरामध्ये मोकार फिरणारे आहे,त्यांच्यावर आता पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे आज तोफखाना हद्दीमध्ये विनाकरण फरणाऱ्याची कोरोनाची टेस्ट करण्यात आले असून जे कोणी असे सापडले होते त्यांची सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे, अशाच प्रकारची कारवाई उद्यापासून चालू राहील असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.


काल नगर शहरामध्ये विभागीय आयुक्त रामकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झालेली होती या बैठकीमध्ये शहरांमध्ये जी रुग्ण संख्या वाढत चाललेले आहे चिंताजनक बाब आहे आता रस्त्यावर मोका फिरणारे जे कोणी आहे, तात्काळ टेस्ट करा अशा प्रकारची निर्देश दिले होते, येथील जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी येथील सर्व पोलीस ठाण्यांना त्या प्रकारच्या सूचना दिल्या होत्या, जे कोणी रस्त्यावर दिसेल व जे विनाकारण फिरत आहे अशांची तात्काळ टेस्ट करा अशा प्रकारचे आदेश दिले होते.


आज नगर शहरामध्ये जेव्हा जे फिरत होते त्यांना थांबवून त्यांची टेस्ट करण्यात आले हो येथील पोलिस प्रशासनाला आठ जणांची टेस्ट केली यातील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहे या संदर्भामध्ये तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरवसे यांनी आम्ही आज तपासणी केले आहेत अशा प्रकारची कारवाई उद्या परत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only