Saturday, May 15, 2021

ATM कार्ड क्लोन करुन लाखोंची रक्कम ATM मशिनव्दारे काढुन फसवणुक करणारे उच्चशिक्षित आरोपी सायबर पोस्टे व भिंगार कॅम्प पोस्टे यांचेकडुन जेरबंद

 ATM कार्ड क्लोन करुन लाखोंची रक्कम ATM मशिनव्दारे काढुन फसवणुक करणारे उच्चशिक्षित आरोपी सायबर पोस्टे व भिंगार कॅम्प पोस्टे यांचेकडुन जेरबंद


दिनांक ११/०५/२०२१ यातील फिर्यादी व साक्षीदार यांचे एटीएम कार्ड क्लोन करुन त्यांचे दुसरे एटीएम बनवुन ते वेगवेगळया एटीएम मध्ये वापरुन त्यामधुन फिर्यादी व साक्षीदार यांचे पैसे काढुन फिर्यादी यांची २०,०००रु फसवणुक केली आहे वगैरे मा चे फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गुरंन १७३/२०२१ भा.द.वी ४२०,४०६, ४६५, ४६८, ४७१, ४७४, ३४ सह माहीती तंत्रज्ञान अधि २००० चे कलम ६६ (C)(D) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाले नंतर मा. श्री. मनोज पाटील सो, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सौरभ अग्रवाल सो अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे श्री. राजेन्द्र भो पोलीस निरीक्षक तपासी अधिकारी यांचे नेतृत्वाखाली सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोसई प्रतिक कोळी, पाहेका योगेश गोसावी, पोहेकॉ गोविंद गोल्हार, पोहेकॉ उमेश खेडकर, दिंगबर कारखेले, पोना/ राहुल व्दारके पोकॉ. गणेश पाटील, पोकॉ राहुल गुंडु पोकॉ अभिजीत अरकल मपोना खताळ चापोहेकॉ वासुदेव शेलार या सायबर पोलीस स्टेशन व भिंगार कॅम्प पोस्टेच्या संयुक्त पथकाने सदर गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषण करून गुन्हयाचे अनुषंगाने ATM मधील CCTV फुटेज ताब्यात घेवुन आरोपींचा शोध घेणेकामी नगर शहर, सावेडी तसेच भिंगार परिसरात नमुद आरोपीचा शोध घेणेकामी पथक फिरत असताना पोनि राजेन्द्र भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, CCTV फुटेज मधील आरोपी हे नगर कल्याण रोडने जाताना दिसले आहे. त्या अनुषंगाने तपास पथकांना पोनि भोसले सो यांनी सुचना करुन त्याचे पथकातील वरील अधिकारी व कर्मचारी यांनी नगर कल्याण रोडने पाठलाग करुन त्यांना टोकावडे ता ठाणे येथे मिळुन आले. त्यांचे कडे नमुद गुन्हयाचे अनुषंगाने अधिक चौकशी करता त्यांनी त्यांचे नाव १) धिरज अनिल मिश्रा वय ३३ वर्षे २) सुरज अनिल मिश्रा वय २२ वर्षे रा नायगाव मुंबई असे सांगुन त्यांनी नमुद गुन्हा हा केल्याची कबुली देवुन त्याप्रमाणे अहमदनगर येथे इतर काही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यावर सदर आरोपींना भिंगार कॅम्प पोलीस गुरंन १७३ / २०२१ भा.द.वी ४२०, ४०६, ४६५, ४६८, ४७१, ४७४, ३४ सह माहीती तंत्रज्ञान अधि २००० चे कलम ६६ (C) ( D ) प्रमाणे गुन्हात अटक करुन मा न्यायालयात हजर केले असता त्यांना मा न्यायालयाने दि.१९/०५/२०२१ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. पुढील तपास सायबर पोलीस स्टेशनचे श्री राजेंद्र भोसले पोलीस निरीक्षक हे करीत आहेत,


तसेच सर्व नागरीकांना सायबर पो.स्टे. च्या वतीने आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात आपले ATM कार्ड देवु नये तसेच आपल्या ATM कार्डचा पिन नंबर कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करु नये. व कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये.


सदर कामगिरी मा. श्री. मनोज पाटील सो, अधीक्षक अहमदनगर, मा. श्री. सौरभ अग्रवाल सो अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरील पथकाने केली आहे.


( सौरभ कुमार wm *अग्रवाल) अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only