Sunday, May 16, 2021

गजराज नगर अहमदनगर येथे गावठी कटटा विक्रीच्या उददेशाने कब्जात बाळगणा-या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद


 


गजराज नगर अहमदनगर येथे गावठी कटटा विक्रीच्या उददेशाने कब्जात बाळगणा-या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद


दिनांक १६/०५/२०२१ रोजी श्री अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गोपनिय माहीती मिळाली कि, एक इसम नामे इकबाल उर्फ सोनू सिकंदर शेख हा वारूळवाडी रोड गजराजनगर अहमदनगर येथे गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहीती मिळाल्याने पोनि. श्री अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ/ मन्सुर सय्यद, शंकर चौधरी, संदीप पवार, रविकिरण सोनटक्के, शिवाजी ढाकणे, जालींदर माने आकाश काळे, बबन बेरड यांनी मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार वारूळवाडीरोड गजराज अहमदनगर येथे जावुन सापळा लावून बातमीतील नमुद इसमास ताब्यात घेवून त्याला त्याचे नावे पत्ते विचारले असता त्याने त्याचे नाव १) इकबाल उर्फ सोनू सिकंदर शेख रा. गजराज अहमदनगर असे सांगीतले त्यास त्याचेकडील गावठी कट्टा व काडतुसे बाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की, सदरचा गावठी कट्टा व काडतूसे मी २ ) दिपक कपीले रा.शेवगांव (फरार) याचेकडुन विकत घेतलेले असून ते ३) सोहेल सय्यद अब्दुलगणी रा गजराज नगर अ.नगर यास विक्री केलेला आहे, असे सांगितल्याने सोहेल सय्यद अब्दुलगणी रा गजराजनगर अ.नगर यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता सोहेल सय्यद अब्दुलगणी याच्याकडे एक गावठी कटटा व २ जिवंत काडतूस असा ३०४००/- रू. कि. चा मुददेमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे सदर बाबत एमआयडीसी पो.स्टे. गु.र.नं. / २१ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५.७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई एमआयडीसी पो.स्टे. हे करीत आहेत.


सदर आरोपी यांचे विरुध्द यापुर्वी दाखल असलेले गुन्हे खालीलप्रमाणे इकबाल सोनु सिकंदर शेख रा. गजराज नगर अ.नगर


सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभ अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अ.नगर व श्री. अजित पाटील, उप विभा पोलीस अधिकारी साो, नगर ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only