Tuesday, May 25, 2021

नगर शहरातील बाजारपेठ सुरु करण्यात यावी शिवसेनेचे व्यापारी शिष्टमंडळासह आयुक्तांना निवेदननगर शहरातील बाजारपेठ सुरु करण्यात यावी शिवसेनेचे  व्यापारी शिष्टमंडळासह आयुक्तांना निवेदन 


नगर - नगर शहरात मागील ६ एप्रिल पासून सर्व बाजारपेठ कोरोना मुळे बंद करण्यात आली आहे . या बरोबर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत ,बाजरपेठेमुळे त्यावर अवलंबून असणारे हजारो  कामगार यांचेवर आता उपासमारीची वेळ आली आहे . आता नगर शहराची रुग्ण संख्या सुद्धा झपाट्याने कमी होत आहे .त्यासाठी आता मनपा ने पुढाकार घेऊन बाजारपेठ सुरु करावी  तसेच सर्व नियम व अटींचे पालन करून त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी .अशी मागणी शहर  शिवसेना व शहरातील सर्व व्यापारी असोसिएशन च्या वतीने मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली .याप्रसंगी शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम ,नगरसेवक दत्ता कावरे ,एस झेड चोपडा ,निखिल नहार ,पोपट लोढा ,प्रसाद बोरा ,नवरत्न डागा ,तेजस डागा ,ईश्वर बोरा ,प्रतीक बोगावत ,प्रशांत मुथा ,मनोज काळे ,शेखर भंडारी आदी उपिस्थत होते 


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only