Monday, May 24, 2021

अहमदनगर स्थापना दिनी अाॅनलाइन कार्यक्रम आयोजित करावा, अशी मागणी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांची मागणी



 ‘शहराचा स्थापना दिन

मनपाने साजरा करावा’

अहमदनगर - अहमदनगर शहराचा ५३१ वा स्थापना दिन येत्या २८ मे रोजी आहे. या शहराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापालिकेने स्थापना दिनी अाॅनलाइन कार्यक्रम आयोजित करावा, अशी मागणी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली.

  सोळाव्या शतकात जगातील सुंदर शहरांमध्ये आपल्या शहराची गणना होत असे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे, वडील शहाजीराजे, राजमाता जिजाऊंचे वडील लखुजीराव ही सगळी मंडळी निजामशाहीतच आपल्या कर्तत्वानं मोठी झाली, इतिहासाचा साक्षीदार असलेला भुईकोट किल्ला, बागरोजा, फराहबख्क्ष महाल यासारख्या वास्तू शहर आणि परिसरात आहेत माळीवाडा वेशीजवळील श्रीविशाल गणपती, मेहेराबाद, आनंदधाम, वेदांत दत्त देवस्थानसारखी महत्त्वाची धार्मिक स्थळं इथं आहेत, पर्यटनाला चालना दिली, तर नगर शहरातील आर्थिक उलाढाल व रोजगाराच्या संधी वाढायला मदत होईल. सध्या लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे जाहीर कार्यक्रम घेता येत नाहीत. तथापि, अाॅनलाइन कार्यक्रम घेऊन या शहराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबर भविष्यातील योजनांचे नियोजन करता येऊ शकेल, असे फुलसौंदर यांनी सांगितले.

    यावेळी इतिहास संशोधक भूषण देशमुख , उपक्रमशील शिक्षक श्री. सतीश गुगळे, इतिहासप्रेमी श्री. पंकज मेहेर उपस्थित होते.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only