Monday, May 17, 2021

वाहने जप्त करण्याची पोलिसांनी केलेली कारवाई सुरू

 



नगर दिनांक 17 प्रतिनिधी 


नगर जिल्ह्यामध्ये करोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे आता मोकार फिरण्यावर कडक कारवाई मोहीम पोलिस विभाग घेतली असून आज पासून जे कुणी मोकार फिरत आहे आशांची कोरोना  चाचणी करून त्यांचे वाहन जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात सुरवात केली आहे दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश दिल्यानंतर शहरांमध्ये ही कारवाई सुरू करण्यात आली आहे 


जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढत चालल्यामुळे प्रशासनावर आता गान वाजू लागला आहे अनेक निर्बंध हे खडक करण्यात आलेले आहेत जिल्हा पोलिस प्रशासनाने जे  विनाकारण फिरत आहेत अशांची रस्त्यात मध्येच चाचणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे जे पॉझिटिव्ह सापडलेले आहेत त्यांना तात्काळ विलीनीकरण केंद्रामध्ये नेण्यात येत आह एवढे होऊन देखील सुद्धा अजूनही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहे


नगर जिल्ह्यामध्ये आता वाहनांवर कारवाई करावी व संबंधित वाहन जप्त करावे असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्यानंतर आज नगर शहरामध्ये शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विलास ठुमे यांनी शहरांमध्ये वाहनावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे जी वाहने जप्त करण्यात आलेले आहे ती दिनांक 31 मे पर्यंत ही पोलिसांच्या कडे राहणार असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाणार


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only