Saturday, May 15, 2021

जिल्ह्यावर ताऊते वादळाच्या परिणामांचे सावट पावसाची शक्यता, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

जिल्ह्यावर ताऊते वादळाच्या परिणामांचे सावटपावसाची शक्यता, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनअहमदनगर/प्रतिनिधी- सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात अरबी समुद्रातील’ताऊते’ या चक्रीवादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनार पट्टीवर 40 ते 60किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.यामुळे 16 व 17 मे रोजी नगर जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अहमदनगर जिल्हयातही या वादळाचापरिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्हावासियांनी काळजी घेण्याचे आवाहनजिल्हा प्रशासनाने केले आहे.16 मे रोजी या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवाकिनारपट्टीवर 50 ते 70 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यताहवामान विभागाने वर्तवली आहे. 17 मे रोजीही या वादळाचा प्रभाव राहणार असून, त्याचापरिणाम महाराष्ट्रातील काही भागात होणार आहे. तुरळक ठिकाणीगडगडाटसह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे. या कालावधीतसोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात वादळासह मध्यम पाऊसनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचापाऊस पडण्याचे संकेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिले आहेत. नगरजिल्ह्याकरिता पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज विद्यापीठाने वर्तविला आहे.या हवामान अंदाजात विद्यापीठाने म्हटले आहे की, पुढील पाच दिवस आकाशकाही ठिकाणी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दि. 15 व 16 मे रोजीजोराचे वारे व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका तर दि.17 ते 18 मे रोजी जोराचे वारे व विजेच्या कडकडाटांसह काहीठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.विद्यापीठाने दिला कृषी सल्लापावसाची शक्यता असल्याने कापणी केलेली पिके शेडमध्येकिंवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत, पिकांची काढणी शक्यतोसकाळच्या वेळेतच करावी व पावसापूर्वी करून घ्यावी, वादळी वार्‍याची शक्यता असल्याने फळपिकाचे संरक्षण करण्यासाठी बांबू किंवा लाकडी काड्यांचा आधार देऊनप्लास्टिक दोरीच्या सहाय्याने झाडे एकमेकांना बांधून घ्यावीत, पावसाच्याशक्यतेमुळे विद्युत उपकरणाचा संपर्क टाळावा तसेच जनावरांना उघड्यावर चरावयासपाठवू नये

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only