Saturday, May 15, 2021

चाँद सुलताना हायस्कूलमध्ये नवीन लसीकरण उपकेंद्राचा शुभारंभ जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास कोरोनावर मात करणे शक्य होईल - बाळासाहेब बोराटे

 चाँद सुलताना हायस्कूलमध्ये नवीन लसीकरण उपकेंद्राचा शुभारंभ

जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास कोरोनावर मात करणे शक्य होईल

- बाळासाहेब बोराटे

नगर - मनपाच्या आरोग्य केंद्रवर लसीकरणासाठी होत असलेल्या गर्दी कमी करण्याचा दृष्टीने महात्मा फुले आरोग्य केंद्राचे उपकेंद्र म्हणून शहराच्या मध्यवस्तीतील चाँद सुलताना हायस्कूल येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्राचा शुभारंभ नगरसेवक नज्जू पहिलवान यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा कारागृह अधिक्षक नागनाथ सावंत, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, दत्ता कावरे, विशाल वालकर, तारीक कुरेशी, आसीफ पटवेकर, वसिम शेख, गणेश  आरे, दत्ता लक्षशेट्टी, रवी चवंडके, आनंद मुथा, गगन शिंदे, आकाश पटवेकर  व ब्रेथ फौंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाच्यावतीने विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. यात नागरिकांचे लसीकरणास प्राधान्य देऊन कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासकीय यंत्राणा अहोरात्र काम करत आहे. मनपाच्यावतीनेही शहरातील विविध आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. परंतु लसीकरणासाठी होत असलेली गर्दीमुळे सोशल डिस्टिसिंगचा फज्जा उडत आहे. पहिला डोस- दुसरा डोस यामुळे आरोग्य कर्मचारी व नागरिकांनामध्ये तणावाचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी परिसरात आणखी एखादे उपकेंद्र सुरु करावे, अशी आपण मनपा आयुक्तांकडे मागणी केली. त्यांनी ती मान्य केल्यानंतर नगरसेवक नज्जू पहिलावन यांच्या सहकार्याने चाँद सुलताना हायस्कूल येथे जागाही उपलब्ध झाल्याने आज हे उपकेंद्र सुरु झाले आहे. या उपकेंद्रामुळे नागरिकांची सोय होऊन इतर आरोग्य केंद्रावरील ताणही कमी  होणार आहे. जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास कोरोनावर मात करणे शक्य होईल यासाठी नागरिकांनीही नियमांचे पालन करुन या केंद्रातील सुविधांचा लाभ घेऊन आपले लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन केेले.

याप्रसंगी नज्जू पहिलवान म्हणाले, नगरसेवक बाळासाहेब बोराटे हे नेहमीच नागरिकांच्या प्रश्‍नांसाठी पुढाकार घेत असतात. कोरोनामुळे सर्वत्र भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्थाही पुढाकार घेत आहेत. लसीकरण हा महत्वाच भाग असल्याने आम्ही या उपकेंद्रासाठी तातडीने ही जागा उपलब्ध करुन दिली. या केंद्रातून नागरिकांना चांगली सेवा मिळेल असे सांगितले. 

यावेळी परेश लोखंडे यांनी प्रास्तविकात या उपकेंद्राची माहिती दिली. या केंद्रावर लस घेण्यासाठी येणार्‍या नागरिकांना पाणी व चहाचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगून  हे उपकेंद्र सुरु करण्यासाठी मनपा आयुक्त, उपायुक्त, आरोग्य अधिकारी यांनी केेेलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. 

याप्रसंगी नागनाथ सावंत, दत्ता कावरे या तारिक कुरेशी आदिनी आपले मनोगतून उपकेंद्र सुरु केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शेवटी विशाल वालकर यांनी सर्वांचे आभार मानले. 

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only