Tuesday, May 4, 2021

बनावट धनादेशाव्दारे कोट्यावधी रुपये काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील मुख्य सुत्रधार दिल्ली येथून जेरबंद

 बनावट धनादेशाव्दारे कोट्यावधी रुपये काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील मुख्य सुत्रधार दिल्ली येथून जेरबंद


अहमदनगर 


दिनांक २२/०४/२०२१ रोजी आरोपी नामे १) विपूल नरेश वक्कानी, वय- ४० वर्षे, ह. रा. प्लॉट नं. १०, कवडे पाटील कॉर्नर, बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव, पुणे, मूळ रा. प्लॉट नं. डी-९०३, मार्वल इनिगमा, युवान आयटी पार्क जवळ, खराडी, पुणे याने व त्याचे इतर साथीदारांनी मिळून स्टेट बँक, शाखा- सावेडी येथे बनावट चेक वटविण्याचा प्रयत्न करुन तसेच साथीदार आरोपशी संगनमत करुन अशाच प्रकारे आयसीआयसीआय बँक, शाखा चिंचवड, पुणे येथेही बनावट चेक वटविण्याचा प्रयत्न केला तसेच वेगवेगळ्या फर्म, सरकारी एजन्सी यांचे नावाने बनावट शिक्के तसेच बनावट व खोटे चेक तयार करुन त्यावर खोट्या सह्या करुन सदर दस्त हे खरे असल्याचे भासवून शासनाची व वेगवेगळ्या फर्मची फसवणूक करुन ते बँकेमध्ये वटविण्याचा प्रयत्न करुन फसवणूक केलेली आहे. याबाबत पोना/१५१६ रविकिरण बाबूराव सोनटक्के, नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी तोफखाना पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ३१७/२०२१, भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७२, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


सदर गुन्ह्याचा तपास श्री. मिथून घुगे, सहायक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे करीत असून सदर गुन्ह्यात यापूर्वी आरोपी नामे १) विपूल नरेंद्र वक्कानी, वय- ४० वर्षे, रा. प्लॉट नं. १०, कवडे पाटील कॉर्नर, बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव, पुणे, २) यशवंत दत्तात्रय देसाई, वय- ४९ वर्षे, रा. सी-४१, एसडीएफसी कॉलनी, शाहूनगर, चिंचवड, पुणे, ३) नरेश रामचंद्र बालकोंडेकर, वय- ३३ वर्षे, रा. सर्वे नं. २३, हनुमान नगर, भगत वस्ती, भोसरी, पुणे, ४) राहूल ज्ञानोबा गुळवे, वय ४६ वर्षे, रा. राम मंदीर जवळ, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे, ५) संदीप पंजाबराव भगत, वय ३२ वर्ष रा. कच्चरवाडी ता. इंदापुर जि. पुणे, ६) तुषार आत्माराम कुंभारे, वय ३४ वर्ष रा. कुंभारवाडा, वाघोली, जि. पुणे, ७) पंचशिल ज्ञानदेव शिंदे वय ४५ वर्ष रा. पुष्पा हो सोसा. संभाजी नगर, चिंचवड, जि. पुणे यांना अटक करण्यात आलेली आहे.


तपासामध्ये सदर गुन्ह्यात विजेंद्र दक्ष, रा. कालकाजी, दक्षिण दिल्ली हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर यांचे परवानगीने व श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि मिथून घुगे, पोना/सचिन आडबल, विशाल दळवी, लक्ष्मण खोकले, पोकॉ/रोहीत येमूल, चा. पोहेकॉ/ उमाकांत गावडे अशांनी मिळून दिल्ली येथे जावून दिल्ली पोलीसांचे मदतीने आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे विजेन्द्रकुमार उर्फ विजेन्द्र रघुनंदनसिंग दक्ष, वय ३९ वर्षे, रा. एन-२, कालकाजी, दक्षिण दिल्ली यांस ताब्यात घेतले. सदर आरोपीस मा. महानगर दंडाधिकारी, साकेत न्यायालय परिसर, नवी दिल्ली यांचे न्यायालयात हजर करुन आरोपीची दोन दिवसांची ट्रान्झीट रिमांड घेवून त्यांस अहमदनगर येथे आणून दि. ०३/०५/२०२१ रोजी अहमदनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची दि. ०७/०५/२०२१ रोजी पावेतो पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचेकडून महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील अशा प्रकारचे विवीध गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील कार्यवाही श्री. मिथून घुगे, सहायक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे करीत आहेत.


सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटिल साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. विशाल ढुमे साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, नगर शहर विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only