Sunday, May 2, 2021

चंद्रकांत पाटील ,छगन राव भुजबळ साहेबांला धमकी देण्या अगोदर आपली लायकी ओळखा- भरत गारुडकर

 


*चंद्रकांत पाटील ,छगन राव भुजबळ साहेबांला धमकी देण्या अगोदर आपली लायकी ओळखा- भरत गारुडकर*

अहमदनगर / प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे राष्ट्रीय ओबीसी नेते ना.छगनराव भुजबळ साहेबांनी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली आहे.अखंड ओ बी सि  समाज्याचे हृदय सम्राट आहेत, त्यांच्यावर गरळ ओकणे म्हणजे सूर्यावर गरळ ओखण्यासारखे आहे. चंद्रकांत पाटलांनी आपली लायकी आणि अवकात ओळखून बोलताना तारतम्य पाळावे अन्यथा समता सैनिक त्यांच्या अंदाजामध्ये चोख उत्तर देतील असा सज्जड इशारा महात्मा फुले समता परिषदेचे अहमदनगर उपाध्यक्ष भरत गारुडकर  यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भरत गारुडकर यांनी म्हटले आहे की, चंद्रकांत पाटील यांनी देशाचे ओबीसी नेते ना.छगनराव भुजबळ साहेब  यांच्यावर बोलताना कुवत बघून बोलावे,उचलली जीभ लावली टाळूला असे विधान करू नये. ना. छगनराव भुजबळ यांनी केलेले प्रत्येक विधान अभ्यासपूर्ण असते, खोट्या गुन्ह्यांमध्ये बोलावून घेऊन अटक करणे म्हणजे खूप मोठे मर्दानगीचे काम नाही. ना. छगनराव भुजबळ आजही आणि कालही धुतल्या तांदळासारखे शुभ्र आहेत. गोरगरिबांचे कैवारी आहेत.आज बोललात, यापुढे असे विधान केले तर अहमदनगर  जिल्ह्यातील नव्हे तर देशातील समता सैनिक तुम्हाला रस्त्याने फिरू देणार नाही. दुसरी बाब भुजबळ साहेबांना धमक्या देण्यासाठी आज पर्यंत कोणी निर्माण झाला नाही. तुम्ही धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर समता सैनिक तुम्हाला माफ करणार नाहीत. त्यामुळे चंद्रकांत पाटील असे फालतू विधान या पुढे करू नका असा धमकीवजा इशारा भरत गारुडकर यांनी दिला आहे.Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only