Friday, May 28, 2021

आ.संग्राम जगताप यांनी जाणून घेतले बालरोग तज्ञाचे मत तिसर्‍या लाटेत औषधे कमी पडून दिले जाणार नाही-आ. संग्राम जगताप

 आ.संग्राम जगताप यांनी जाणून घेतले बालरोग तज्ञाचे मत


तिसर्‍या लाटेत औषधे कमी पडून दिले जाणार नाही-आ. संग्राम जगताप


अहमदनगर प्रतिनिधी- कोरोनाची पहिली व दुसऱ्या लाटे मध्ये नागरिकांनी गांभीर्याने घेतली नसल्यामुळे विविध समस्यांला व गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले, तज्ञांच्या मते सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून १८ वर्षा खलील मुले बाधित होण्याची शक्यता आहे. मुलांवर उपचार करण्यास व सुविधा देण्यास कुठलीही अडचण येऊ नये यासाठी शहरांतील बालरोग तज्ञांचे मते जाणून घेऊन उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून कुठेही लहान मुलांचे औषधे, ॲम्बुलन्स,व्हेंटिलेटर कमी पडू देणार नाही तिसऱ्या लाटे करता आम्ही तयार आहोत आणि ती आम्ही येऊ देणार नाही यासाठी  उपायोजना करण्यात सुरुवात केली असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

        आ.संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मनपा आरोग्य समितीच्या वतीने शहरातील बालरोग तज्ञांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे सदस्य,सचिन जाधव,विपुल शेटीया,डॉ.नानासाहेब अकोलकर,डॉ.सुचित तांबोळी,डॉ. प्रताप पटारे,डॉ.मकरंद धर्मा, डॉ.संदीप गायकवाड,डॉ.गणेश माने,डॉ.दिपक कर्पे,डॉ.सुरेंद्र रच्चा,डॉ.सागर वाघ,डॉ.सचिन वहाडणे,डॉ. दिलीप बागल, डॉ.श्याम तारडे,डॉ.चेतना बहुरूपी,डॉ. सोनाली हिवाळे आदी तज्ञ डॉक्टर यावेळी उपस्थित होते.

          यावेळी बालरोग तज्ञानी विविध सूचना मांडत असताना सांगितले की,कोरोच्या तिसऱ्या लाटेला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.लहान मुलांवर या विषाणूंचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होणार नाही,९५% लहान मुलांना या संसर्ग विषाणूचे लक्षण जाणवणार नाहीत,५% मुलांमध्ये कमी-अधिक प्रमाणात ही लक्षणे जाणवतील यासाठी औषधांचा तुटवडा होऊ नये तसेच लहान मुलांसाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये ॲम्बुलन्सची स्वतंत्र व्यवस्था करावी,नगर शहरात बरोबर जिल्ह्यामध्ये आपत्कालीन कक्ष उभारावे जेणे करून लहान मुलांना आपल्या भागामध्ये उपचार घेण्यास मदत होईल, जेणेकरून लहान मुलांना उपचारासाठी लागणारा प्रवास हा टाळता येईल,शहरात सुमारे ४० बालरोग तज्ञ आहे. हे सर्व तज्ञ पूर्णपणे आरोग्यसेवा देण्यास तयार आहेत.लहान मुलांना मध्ये स्कोर हा विषय दिसणार नाही, ग्रामीण भागामध्ये बाला रुग्णांवर उपचार पद्धत पोहचत नाही त्याना व्हिडिओ कॉल द्वारे उपचार दिले जातील.नगर शहरातील बालरोग तज्ञांकडे पुणे,मुंबई  या भागातून मोठ्या प्रमाणात बालरुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. लहान मुलांच्या लसीकरणाची जबाबदारी शहरातील सर्व डॉक्टरांकडे द्या आम्ही ती सक्षम पणे पार पाडू तसेच काही वर्षांपूर्वी स्वाईन फ्लू आजार रोखण्यासाठी फ्लू लसची मोठी मदत झाली ही लस पाच वर्षाच्या आतील मुलांना द्यावी जेणेकरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. तसेच याच बरोबर लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे देण्यात यावी, या लाटेमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे कुपोषित मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे यासाठी कुपोषित बालकांची माहिती गोळा करणे गरजेचे आहे.तसेच महापालिका आरोग्य विभाग व शहरातील डॉक्टरांचा झूम ॲपद्वारे संवाद होऊन उपचार पद्धती करणे गरजेचे आहे,याच बरोबर पालकांमध्ये ही जनजागृती करण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे या झालेल्या बैठकीत तज्ञ डॉक्टरांनी सूचना मांडल्या. यावेळी आ.संग्राम जगताप यांनी या सूचनांचे विचार करून आमलात आणल्या जातील तसेच यासूचना राज्य सरकारकडेही सूचना मांडल्या जातील असे ते म्हणाले.

         यावेळी बोलताना आरोग्य समितीचे डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ञाची कमिटी स्थापन करून उपचार पद्धत राबवण्यात येणार आहे. बालरोग तज्ञ यांनी मांडलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only