Wednesday, May 5, 2021

हनुमान मंदिराच्या दानपेटी तून पंधरा हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

 
नगर दिनांक पाच प्रतिनिधी येथील लक्ष्मीबाई कारंजा यांच्या परिसरात असलेल्या हनुमान मंदिराच्या दानपेटी तून पंधरा हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शांतीलाल भगवानदास मुनोत राहणार महाजन गल्ली यांनी या संदर्भामध्ये फिर्याद दाखल केली आहे
 मी वरील ठिकाणी कुटुंबासह राहत आहे. शहरात लक्ष्मीबाई कारंजा चौक येथे हनुमान मंदीर असून, सदर मंदीराचे १९८४ पासुन मी व अरुण कंकाळ सर असे ट्रस्टी आहोत. आम्ही हनुमान जयंतीच्या वेळी दर वर्षी मंदीरातील दान पेटी उघडुन दान पेटीत जमा झालेल्या रकमेतुन हनुमान जयंती सन उत्सव साजरा करत असतो. चालु वर्षी कोरोणा संसर्ग असल्यामुळे दान पेटी उघडली नव्हती. सदर मंदीर लॉकडाऊन असल्यापासुन कुलुप लावुन बंद असते त्याची च्यावी मंदीरा शेजारी पुष्प विक्री करणारे ऋषीकेश अरुन अलचेटटी याचेकडे असते. ते रोज सकाळी ०७.०० वा. दरम्यान उघडुन पुजा करुन बंद करतात. दि.०४.मे २०२१ रोजी सकाळी ०७.०० वा. सुमारास ऋषीकेश अरुन अलचेटटी यांनी मंदीर उघडुन पुजा करुन मंदीर बंद केले होते.


दि.०५.मे.२०२१ रोजी सकाळी ०६.०० वा. सुमारास हनुमान मंदीरा शेजारी राहणारे संतोष विठठल जाधव धंदा-सलुन रा.सदर यांनी फोनव्दारे मला कळविले की, हनुमान मंदीराचे कुलुप कुणीतरी तोडल्याचे व दरवाजा उघडा दिसुन येत आहे. तसेच मी लगेच हनुमान मंदीर लक्ष्मीबाई कारंजा चौक येथे गेलो व मंदीराची पाहणी केली असता मंदीराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन मंदीरात खांबाला साखळीने बांधलेली स्टीलची दान पेटी मला दिसुन आली नाही. त्यावर मी पूर्ण मंदीरात आजुबाजुला दान पेटीचा शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. त्यावर माझी खात्री झाली की, दान पेटी कोणीतरी अज्ञात चोरटयानी चोरुन नेली आहे. सदर दान पेटीतील रक्कम व दान पेटीचे वर्णन  १५.०००/-रु. किं.ची त्यात रक्कम अंदाजे ५,१० रु ची नाणी व १०, २०, ५० रु. च्या चलनी नोटा असे व तसेच स्टील ची ३ फुट उंचीची व १ फुट लांबी दान पेटी आहे. सदर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर ही बाब लक्षात आली असून तेथे चोरी झाल्याचे लक्षात आले आहे या संदर्भामध्ये कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये मुनोत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only