Tuesday, May 11, 2021

जिल्हा रुग्णालय मध्ये पोलिसांना धक्काबुक्की


 नगर दिनांक 13 प्रतिनिधी 


जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये रुग्णांच्या नातेवाइकांना प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. असे असताना येथे कार्यरत असलेल्या पोलिसांना दमदाटी करून धमकावण्याचा प्रकार केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


चंद्रकांत आनंद उजागरे (राहणार मराठी मिशन कंपाउंड, स्टेशन रोड, कोठी, नगर), संदिप उत्तम मरकड (राहणार मिरी, तालुका पाथर्डी, जिल्हा नगर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस नगर जिल्ह्यामध्ये वाढत चाललेला आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये त्यावर उपचार सुरू आहेत. या उपचारादरम्यान नातेवाईकांना या ठिकाणी येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. तसेच या ठिकाणी अन्य कोणी सुद्धा प्रवेश करणार नाही अशा संदर्भातले आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले यांनी दिल्यानंतर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आलेले रुग्ण यांना फक्त प्रवेश दिला जातो. तसेच त्या ठिकाणी वाहने लावण्यास सुद्धा मज्जाव करण्यात आलेला आहे. असे असताना देखील या ठिकाणी जे पोलीस कर्मचारी हजर होते त्यांना वरील दोन आरोपींनी आम्हाला आमच्या नातेवाइकांना भेटू द्या, आम्हाला तुम्ही आत मध्ये का सोडत नाही. मी तुमच्याकडे बघून घेतो व तुमची नोकरी घालवतो असे म्हणत पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना घडलेली आहे.  त्यांना दमदाटी केली. सदर प्रकरणानंतर येथे कार्यरत असलेले पोलिस अमोल बळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर वरील दोन आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके हे पुढील तपास करत आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only