Tuesday, May 11, 2021

कामरगाव येथे अपघात करुन दोन व्यक्तीच्या मृत्युस कारणीभुत ठरलेला रेकॉर्डवरील सराईत आरोपी चोरीच्या 5 लाखाच्या वाहनासह अटक नगर तालुका पोलीस स्टेशनची कारवाई.

 
कामरगाव येथे अपघात करुन दोन व्यक्तीच्या मृत्युस कारणीभुत ठरलेला रेकॉर्डवरील सराईत आरोपी चोरीच्या 5 लाखाच्या वाहनासह अटक नगर तालुका पोलीस स्टेशनची कारवाई.


दि. 09/05/2021 रोजी नगर तालुका पो.स्टे 1 गुरनं. 233 / 2021 भादवि कलम 304(अ), 279,337,338,427 मो.वा.का.क. 184,134(अ) (ब) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी व नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.न. 216/2021 भा.द.वि.क.357,480 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी उमेश उर्फ ओंकार मधुकर शिंदे रा. पिंपरी आंतरवन जि. बीड नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधे त्याचे ताब्यातील चोरीचे वाहन क्र. MH 12 HN 8462 हे रस्त्याने भरधाव वेगात हयगयीने चालवून दोन व्यक्तींचा अपघात करुन त्यांचे मृत्युस कारणीभूत होवुन वाहणाचे नुकसानिस कारणीभूत झाला व सदर चा गुन्हा करुन आरोपी वाहणासह फरार झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सो व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रावाल सो. उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटोल सो यांचे मार्गदर्शना खाली सुरु होता.


सदरच्या गुन्हयाचे तपासादरम्यान मिळालेल्या बातमी नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सान नगर तालुका पोलीस स्टेशन पो.उप.नि. डी. आर जारवाल पोना/ राहुल शिंदे, पोना/अशोक मरकड, महिला पोना/प्रमीला गायकवाड, पोकॉ/ धर्मराज दहिफळे नगर तालुका पोलीस स्टेशन यांचे पथकाने आरोपी नामे उमेश उर्फ ओंकार मधुकर शिंदे रा. पिंपरी आंतरवन जि. बीड यास अपघातातील वाहण क्र. MH 12 HN 8462 सह आज दि. 10/05/2021 रोजी ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीस विश्वासात घेवुन विचारपुस केली असता सदर अपघातातील वाहण हे आरोपीने हिजवडी पोलीस स्टेशन हद्दीमधुन गोदरेज कंपनी समोरुन चोरुन आणल्याची कबुली दिली असून त्याबाबत हिंजवडी पो.स्टे. जि. पुणे येथे गु.र.न.325/2021 भा.द.वि.क.379 दाखल असल्याने हिंजवडी पो.स्टे. चे गुन्ह्यातील 5 लाखाचे बोलेरो वाहनासह आरोपी मिळुन आला आहे. सदर आरोपी कडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सो व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रावाल सो. मा. उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील सो. पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या बातमी प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप नगर तालुका पोलीस स्टेशन पो.उप नि पो.उप.नि. डी. आर. जारवाल, पोना/राहुल शिंदे, पोना/अशोक मरकड, महिला पोना/प्रमीला गायकवाड, पोकों दहिफळे नगर तालुका पोलीस स्टेशन यांचे पथकाने सदरची कारवाई केली असुन पुढील तपास चालु आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only