Monday, May 17, 2021

तौक्ते चक्रीवादळा मुळे कानडे मळ्यातील शेतकऱ्याच्या ६ म्हशीं चा मृत्यू; लाखो रुपयांचे नुकसान

 तौक्ते चक्रीवादळा मुळे कानडे मळ्यातील शेतकऱ्याच्या सहा म्हशीं ठार; लाखो रुपयांचे नुकसानअहमदनगर प्रतिनिधी- नगर शहरांमध्येही तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसून शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे.कानडेमळा येथील शेतकरी सदाशिव भाऊसाहेब निस्ताने यांच्या ३० म्हशी कानडेमळा जवळीन भिगारनाल्या मध्ये पाणी पिण्यासाठी गेल्या असताना या तौक्ते चक्रीवादळामुळे विजेच्या तार तुटून विजेचा  झटका या म्हशींना बसला व त्या जागीत ठार झाला. त्यामुळे या शेतकऱ्याचा सुमारे ९ते१० लाख रुपयेचे नुकसान झाले. यावेळी आ. संग्राम जगताप यांनी तहसीलदार तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यानंतर तातडीने पंचनामा करण्यात आला. सुदैवाने याठिकाणी कुठलीही जीवित हानी झाली नाही तसेच आपल्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीची भरपाई शासनाकडून तातडीने मिळवून देण्यात यावी अशी मागणी नगरसेवक प्रकाश भागानगरे व शेतकरी सदाशिव निस्ताने यांनी केली.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only