Tuesday, May 25, 2021

चोरट्यांनी सावेडीतील दुकान फोडले : साडे सहा लाखाचा मुद्देमाल लंपास ; व्यापाऱ्याची पोलिसात तक्रारनगर 25 प्रतिनिधी- नगर शहरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण गेल्या आठवडाभरात वाढले आहे. त्यातच सावेडी भागामध्ये बांधकाम व्यावसायिकाचे दुकान फोडून सुमारे सहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


सावेडी उपनगरातील बांधकाम मटेरियल सप्लायरचे दुकान चोरट्यांनी फोडले. ही घटना आज मंगळवार दिनांक 25 रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. दुकानातील तब्बल साडेसहा लाखाचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. दुकान मालक अरविंद अमृतलाल मुथा यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. 


सावेडीतील महावीर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स या दुकानात ही घटना घडली.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुथा यांचे सावेडीत बिल्डिंग मटेरियल सप्लायरचे दुकान आहे. 20 मे रोजी रात्री ते काल 24च्या रात्रीपर्यंत अज्ञात चोरट्यांनी खिडकी तोडली. दुकानातून गाईड ओईल मिक्सर से 38 नग, त्याची किंमत एक लाख सहा हजार रुपये, नळाचे कॉक 78 नग, त्याची किंमत 35000 रुपये, जल बिब कॉक 65, त्याची किंमत 42250, पीव्हीसी पाईप किंमत एक लाख 750 रुपये, सी आर आय कंपनी च्या पाच मोटारी त्याची किंमत 22500, सिंक भांडे 12 नग, त्याची किंमत 27 हजार 200 यासह विविध प्रकारच्या वस्तू चोरट्याने चोरून नेल्या. एकूण सहा लाख 48 हजार आठशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.


या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन या चोरीची माहिती घेतली. संबंधित परिसरामध्ये ज्यांच्या ज्यांच्या कडे सीसीटीव्ही फुटेज आहे ते सद्धा हस्तगत केले आहे. चोरटे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत असून काहींचा सुगावा सुद्धा लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

 याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only