Friday, May 21, 2021

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन.

 डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी.                         पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन.  

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटल येथील आरोग्य अधिकारी राहुल ठोकळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सिटी केअर हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी संचालक डॉ.संदिप सुराणा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले यावेली हॉस्पिटल मधील कर्मचारी उपस्थित होते.                               यावेळी डॉ.संदीप सुराणा म्हणाले की रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात डॉक्टर ठोकळ यांचा हात फॅक्चर झाले असून त्यांना 30 टाके पडले आहेत त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only