Sunday, May 9, 2021

मनपा आरोग्याधिकारी डॉ. बोरगेंचे वर्तन संशयास्पद पोलिस अधीक्षक पाटील यांचे मनपा आयुक्त गोरे यांनाखरमरीत पत्र

 
मनपा आरोग्याधिकारी डॉ. बोरगेंचे वर्तन संशयास्पद

पोलिस अधीक्षक पाटील यांचे मनपा आयुक्त गोरे यांनाखरमरीत पत्र

अहमदनगर/प्रतिनिधी-महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारीडॉ. अनिल बोरगे यांचे वर्तन संशयास्पद असून, रेमडीसीवीर इंजेक्शन प्रकरणी कोतवालीपोलिसांनी चौकशीला बोलावले असतानाही ते येत नाहीत. रेमडीसीवीर इंजेक्शनबाबतगैरप्रकार होत असल्याबाबत सध्या प्रसार माध्यमांव्दारे माहिती प्रसारित होत असल्याने जनमानसांतयाबाबत संभ्रम निर्माण झाला असताना डॉ. बोरगे चौकशीसाठी येत नसल्यानेयाबाबत आवश्यक कार्यवाहीची गरज आहे, अशा खरमरीत शब्दांचे पत्र पोलिस अधीक्षक मनोजपाटील यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना पाठवले आहे. आता या पत्राबाबतआयुक्त गोरे काय भूमिका घेतात व डॉ. बोरगे कोतवाली पोलिसांच्याचौकशीला कधी सामोरे जातात, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.
पोलिस अधीक्षक पाटील यांनी आयुक्त गोरे यांनापाठवलेल्या पत्रात डॉ. अनिल बोेरगे (आरोग्य अधिकारी, महापालिका अहमदनगर)यांच्या संशयास्पद वर्तणुकीबाबत, असा स्पष्ट उल्लेख करून पुढे म्हटले आहेकी, दि. 24 एप्रिल रोजी रात्री 8.40च्यासुमारास रेणुकामाता हॉस्पिटल (केडगाव, अहमदनगर) येथील डॉ. संदीपवाळुंज हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याने त्यांनी त्यांचे नातेवाईक योगेशऔटी (कंत्राटी कामगार, आरोग्य विभाग, महापालिका, अहमदनगर) यांनाबालदोटा एजन्सी येथून रेमडीसीवीर इंजेक्शन घेऊन येण्याबाबत सांगितले होते.परंतु औटी यांनी बलदोटा एजन्सी येथून रेमडीसीवीर इंजेक्शन घेतल्यानंतरहे इंजेक्शन रेणुकामाता हॉस्पिटल येथे तात्काळ पोहोच करणे अपेक्षित असतानादेखीलते तेथे पोहोच न करता डॉ. बोरगे यांच्या महापालिका कार्यालयात जाऊनथांबले. या ठिकाणी शिवसेना पक्षाचे दिलीप सातपुते व इतर कार्यकर्ते यांनी येऊनरेमडीसीवीर इंजेक्शनबाबत विचारणा करू लागल्यानंतर औटी यांनी रेमडीसीवीरइंजेक्शन रेणुकामाता हॉस्पिटलला पोहोच केले. या घटनेमध्ये औटी यांनीअनियमितता केली असल्याचे दिसून येत आहे, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच या घटनेच्या ठिकाणी पोलिस येत असल्याची माहितीमिळताच डॉ. बोरगे त्यांच्या कार्यालयातून निघून गेले. त्यामुळे त्यांच्या मोबाईलवरसंपर्क करुन त्यांना पोलिस स्टेशन किंवा त्यांच्या कार्यालयात चौकशीसाठीबोलविले असतानादेखील ते आले नाहीत. पोलिसांना या ठिकाणी कोणत्याहीप्रकारचे रेमडीसीवीर इंजेक्शन किंवा कोणताही पुरावा मिळाला नाही, त्यामुळेकारवाई करता आली नाही तसेच डॉ. बोरगे यांना वारंवार फोन करूनचौकशीसाठी बोलविले असता ते पोलिस ठाण्यात हजर झाले नाहीत. त्यामुळेरेमडीसीवीर इंजेक्शनबाबत त्यांच्या कार्यालयात घडलेला घटनाक्रम वत्याअनुषंगाने डॉ. बोरगे यांची भूमिका संशयास्पद वाटत आहे.रेमडीसीवीर इंजेक्शनबाबत गैरप्रकार होत असल्याबाबत सध्या प्रसार माध्यमांव्दारेमाहिती प्रसारित होत असल्याने जनमानसात याबाबत संभ्रम निर्माण झालेला असल्याने याप्रकरणात उचित कार्यवाही गरजेची आहे, असेही पोलिस अधीक्षक पाटील यांनी आयुक्तगोरे यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. या पत्रासमवेत कोतवाली पोलिसठाण्याच्या पोलिस निरीक्षकांचा अहवालही आयुक्त गोरेंना पाठवण्यात आला आहे.
--चौकट
स्टेशन डायरीला घेतली नोंद
कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेशमानगावकर यांनी 24 एप्रिल रोजी मनपात घडलेल्या घटनेची नोंद पोलिसठाण्याच्या स्टेशन डायरीत घेतली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, 24एप्रिल रोजी रात्री 8.40च्या सुमारास हद्दीत जीप पेट्रोलिंग करित असताना शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी फ़ोनवर कळविले की जुनी महापालिका येथेडॉ.बोरगे यांच्या कार्यालयात कंत्राटी कामगार योगेश औटीकडेपाच रेमडीसीवीर इंजेक्शन आहेत. तुम्ही तात्काळ येथे या असे सांगितल्याने सहायक पोलिसनिरीक्षक रणदिवे यांना तेथे बोलावून घेतले. त्यावेळी सातपुते व शिवसेना पक्षकार्यकर्ते जमले होते. तेथे त्यांनी आम्हाला वरील हकगित सांगितली व डॉ.बोरगेहे कार्यालयात नसून ते आत्ताच निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर औटीलाबोलावून घेतले व त्याच्याकडून माहिती घेतली. अशोक बलदोटा एजन्सी माणिकचौक येथून 5 इंजेक्शन घेऊन जुनी मनपा येथे आलो व तेथे डॉ.बोरगेयांच्याकडे थांबलो. मात्र ते सर्व इंजेक्शन रेणुकामाता हॉस्पिटलमध्ये जमाकरुन आलो, अशी हकिगत सांगितल्यानंतर डॉ.बोरगे यांना फोन करून जुनी मनपायेथे त्यांच्या कार्यालयात किंवा पोलिस स्टेशनला येण्याबाबत कळविले. मात्र, ते आलेलेनाहीत तसेच शिवसेना कार्यकर्तेसुध्दा पोलिस स्टेशनला कोणतीही तक्रार न देतानिघून गेले. मात्र, हे प्रकरण संवेदनशील असल्याने सहायक पोलिस निरीक्षक रणदिवे यांनाया प्रकरणी चौकशी अंती योग्य ती कायदेशीर कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचेआदेश दिले असल्याचे या नोंदीत म्हटले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only