Tuesday, May 4, 2021

भाजपा चित्रपट कामगार आघाडीची बैठक.अहमदनगर चित्रपटसृष्टी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे, बैठकीत घेतला निर्णय.
 भाजपा चित्रपट कामगार आघाडीची बैठक आज दि. ०३ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने पार पडली, याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.श्री.विजयजी सरोज, , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.श्री. सत्यवानजी गावडे, , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री. संजयजी रणदिवे साहेब, उत्तर महाराष्ट्र व सोलापुर जिल्हा प्रभारी श्री.भुषण भोळे  यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख मा.श्री. ज्ञानेश्वर काकड यांच्या प्रमुख उपस्थिती अहमदनगर जिल्हा ऑनलाईन आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्दे मांडले गेले व त्याच निवारण करण्याबाबत चर्चा झाली. बैठकीत मांडले गेलेलं मुद्दे, १. अहमदनगर चित्रपटसृष्टी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे. २.चित्रपट आणि नाट्य कलावंतांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करणे. ३.कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे किमान मानधन ठरवले जावे . ४.भा ज पा मदत व माहिती केंद्राची स्थापना करणे. ५. प्रदेशाने ठरवून दिलेले प्रोटोकॉल्स च पालन करणे. 

६.लसीकरणा बाबत जनते मध्ये जनजागृती करणे. ७.कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या कामाच्या सातत्यासाठी समिती स्थापन करणे. ८. निर्मिती संस्थांशी कलाकारांना किमान मानधन ठरवून देण्याबाबत बाबत चर्चा करणे. ९.कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी कार्यशाळा आणि शिबीर भरवणे. १०. आर्टिस्ट कार्ड बनवणे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना देणे. ११.कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे हक्क व अधिकार यांच्यासाठी काम करणे. या सगळ्या मुद्यांवर सविस्तर चर्चा आणि कश्या पद्धतीने काम करता येईल याबाबत मार्गदर्शन केलं गेलं आहे.  या बैठकीची सूत्र जिल्हा अध्यक्ष ॲड.पुष्कर तांबोळी यांनी सांभाळली, महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा सौ. साक्षी व्यवहारे, जिल्हाउपाध्यक्ष दर्शन काळे, सुदर्शन कुलकर्णी व कमलेश शेवाळे, चिटणीस कृष्णा जोशी व अवंती होशिंग, जिल्हा सरचिटणीस श्री.अमित रेखी व खुशबू येणारे, सचिव सौ. दीप्ती शुक्रे, संगमनेर तालुका अध्यक्ष मंगेश जोंधळे, सदस्य कन्हैया तिवारी हे  या बैठकीस उपस्थित होते.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only