Monday, May 3, 2021

पूर्वीच्या वादातून झालेल्या गोळीबारामध्ये सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय 21 वर्षे) रा.भेंडा, ता.नेवासा हा युवक जखमी झाला असून त्याचा वर नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

 
भेंड्यातील गोळीबारात एकजण जखमी

काल रविवारी रात्री भेंडा येथे पूर्वीच्या वादातून झालेल्या गोळीबारामध्ये सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय 21 वर्षे) रा.भेंडा, ता.नेवासा हा युवक जखमी झाला असून त्याचा वर नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

याबाबद मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, भेंडा येथील सोमनाथ तांबे व त्याचे इतर 5/6 मित्र रविवार दि.2 मे रोजी रात्री भेंडा येथील एका मैदानावर क्रिकेट खेळत असताना रात्री 9:30 वाजेच्या सुमारास मोटारसायकल वरून आलेल्या दोन तरुणांपैकी एकाने खेळत आलेल्या या तरुणांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात चुकून गोळी लागल्याने सोमनाथ लागल्याने तो गंभीर जखमी झाला. गोळी सोमनाथ चे छातीत मधोमध लागल्याने तो थोडक्यात बचावला.गोळीबार करून हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. 

दरम्यान हल्लेखोरांचा इतर दुसऱ्या कोणाला तरी लक्ष करावयाचे होते. परंतु खेळता खेळता सोमनाथ मध्ये आल्याने त्याला गोळी लागली असे सांगितले जाते. नेवासा पोलिस ठाण्यात भादवी कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी पोलिस निरीक्षक विजय करे यांचेशी संपर्क साधला असता जखमी सोमनाथ तांबे यांचे जबाब व फिर्यादी वरून पप्पू जावळे व गणेश पुंड यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती श्री.करे यांनी दिली.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only