Wednesday, May 5, 2021

नेवासे येथे प्रकरणाला वेगळे वळण . मित्रांनीच गोळीबार नाट्य घडवून आणल्याचा प्रकार उघडकीस


 

तालुक्यातील भेंडा येथे  रविवार दि.2 मे रोजी  रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता सूडनाट्याचे वळण आले असून मुलीच्या कारणावरून  व  घटनेतील  जुन्या वादातील लोकांना अद्दल घडविण्याच्या उद्देशाने जखमी सोमनाथ  तांबे यांच्या मित्रांनीच गोळीबार नाट्य घडवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी नेवासा पोलिसांनी शुभम विश्वनाथ गर्जे,स्वप्नील बाबासाहेब बोधक,अमोल राजेंद्र शेजवळ,अमोल अशोक गडाख,अक्षय रामदास चेमटे यांचे एकूण  10 आरोपींना अटक केली असून एक गावठी कट्टा हस्तगत केला आहे

न्यायालयाने त्यांना दहा मे पर्यंत पोलिस कोठडीसुनावलीआहेअशी माहिती पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे रविवार दि.2 मे रोजी रात्री 9:20 वाजता झालेल्या गोळीबारात सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय 21 वर्षे) रा.लांडेवाडी(भेंडा)  हा युवक गंभीर जखमी झाला होता.

नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याने नेवासा पोलिसांना दिलेल्या जबाब व फिर्यादीत पप्पू जावळे व गणेश पुंड यांचे सारखीच शरीरयष्टी असलेल्या इसमाने माझ्यावर पिस्तुल सारख्या शस्राने फायर केल्याचे व मी जखमी झाल्याचे सांगून या दोन संशयित इसमाविरुद्ध  फिर्याद दिली दिली होती त्यावरून त्यांना अटक करण्यातआली होती

मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून 

पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली

 पोलीस निरीक्षक विजय करे,सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर,उपनिरीक्षक भरत दाते यांचे पथकाने  11 मुलांची पार्श्वभूमी।तपासून पाहिली त्यातील  सोमनाथचे जवळचेच  मित्र शुभम गर्जे व स्वप्नील बोधक यांचेवर पोलीस रेकॉर्डमध्ये गुन्हे दाखल असल्याचे व ज्यांच्यावर संशय घेतला गेला त्यांचे आणि या दोघांचे पूर्वीचे वाद व वैमनस्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी पुढे तपास केला असता मुलीचे कारणावरून व जुन्या वादातील लोकांना अद्दल घडविण्याच्या उद्देशाने जखमी सोमनाथ  तांबे यांच्या मित्रांनी गोळीबार नाट्य घडवून आणल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

समजलेली माहितीअशी की , यातील फिर्यादी सोमनाथ तांबे हा त्याचा मित्र स्वप्नील बोधक याचेकडे व्हॉलीबॉल खेळण्यासाठी सायंकाळी 07:30 वाजेचे सुमारास आला होता. त्याच वेळी त्यांचा मित्र शुभम विश्वनाथ गर्जे रा.वडुले हा देखील त्या ठिकाणी आला.शुभम विश्वनाथ गर्जे रा.वडुले,ता.नेवासा याचे मित्र  अमोल राजेंद्र शेजवळ (वय 22 वर्षे) रा. अंबिकानगर (सोनई), अमोल अशोक गडाख (वय 22 वर्षे) रा. गडाखवस्ती (सोनई), अक्षय रामदास चेमटे रा.घोडेगाव यांनी शिंगणापुर पोलिस ठाण्याचे हद्दीत प्राणघातक हल्ला करुन एका व्यक्तीला कुऱ्हाडीने मारुन गंभीर जखमी कारुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शुभम गर्जे याचे बोलाविल्यावरुन व त्याना घेण्यासाठी वडाळा पाटी येथे जाऊन त्या तिघांना भेंडा येथे व्हॉलिबॉल खेळत असलेल्या मैदानावर घेवुन आला. 

 शुभम विश्वनाथ गर्जे,स्वप्नील बाबासाहेब बोधक, अमोल अशोक गडाख, अक्षय रामदास चेमटे, अमोल राजेंद्र शेजवळ, सोमनाथ तांब हे लांडेवाडी(भेंडा) येथील मैदानावर सायंकाळी हजर असताना त्यातील अक्षय चेमटे याने मुलीचे कारणावरून त्याने हातातील गावठी पिस्तुलातुन सोमनाथ तांबे त्याचे छातीवर गोळी मारली. त्यात सोमनाथ तांबे जखमी होवुन खाली कोसळला. त्यावेळी वरील सर्वांनी कट करुन यातील अमोल अशोक गडाख,अक्षय चेमटे, अमोल शेजवळ यांना गावठी कट्ट्यासह पळनुन लावले.सोमनाथ तांबे यास  पप्पू जावळे व गणेश पुंड यांनी गोळीबार केला असे खोटे नाव सागुन पोलिसांची दिशाभुल केली.

 

परंतु तपासाअंती सदरचा गोळीबार  अमोल अशोक गडाख, अक्षय रामदास चेमटे, अमोल राजेंद्र शेजवळ यांनी केला व यातील आरोपी  शुभम विश्वनाथ गर्जे रा.वडुले व स्वप्नील बाबासाहे बोधक रा.लांडेवाडी(भेंडा) यांनी खोटा बनाव करुन दिशाभुल केली व आरोपी पळवून लावले.

आरोपी ओंकार राजेंद्र काकडे, प्रसाद शिवाजी दळवी, अक्षय संजय हाफशेटे सर्व रा.शहरटाकळी,ता.शेवगाव यांनी आरोपी हे गुन्हेगार आहे व गंभीर गुन्हा करुन आले आहे हे माहीती असतानाही त्यांना मदत केली,आश्रय दिला व राहण्याची व्यवस्था केली . तसेच आरोपी शुभम किशोर जोशी रा. शहरटाकळी याने आरोपीकडील गावठी कट्ट्याचे जिवंत काडतुस स्वत:जवळ ठेवुन घेतली.आरोपी सचिन साहेबराव काते,रा.सामनगाव,ता. शेवगाव याने आरोपींना लपवुन ठेवण्यासाठी व आरोपींना मदत व्हावी म्हणुन आरोपींना लॉजिंग करून दिली व त्यांची राहण्याची व्यवस्था केली.


पोलिसांनी  गुन्ह्यात वापरलेली मल्सर मोटार सायकल,गावठीकट्टा (पिस्तोल) व जिवंत काडतुसे जप्त केली आहे..


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only