Monday, May 10, 2021

फेरीवाला व पथ विक्रेत्यांना अनुदान द्यावे

 नगर दि 12 प्रतिनिधी


नगर शहरातील फेरीवाला व पथविक्रेता रु.१५००/- ची आर्थिक सहाय्य अनुदान द्यावी अशी मागणी नगर शहर हॉकर्स सेवा संघाचे अध्यक्ष शाकीर शेख व भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त शंकर गोरे यांना दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे, निवेदनात म्हटले आहे की,कोवीड-१९ च्या पार्श्वभुमीवर एप्रिल २०२१ मध्ये कोवीड १९ च्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आलेले आहे. यामुळे फेरीवाले व पथविक्रेता यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हि बाब लक्षात घेता  मुख्यमंत्री, उध्दवजी ठाकरे यांनी दिनांक १३ एप्रिल २०२१ रोजी फेरीवाले व पथविक्रेता साठी पॅकेज जाहीर केलेला आहे व त्या अनुषंगाने आर्थिक मदत देणेसाठी संबंधीत महानगरपालिका यांना संदर्भीय शासन निर्णयाव्दारे निर्देश दिलेला आहे. तसेच दि. १५एप्रिल २०२१ पर्यंत PM-SVANIDHI मध्ये अर्ज केलेल्या पथविक्रेता व फेरीवाला यांना सहाय्य अनुदान लागु केला आहे.


त्या अनुषंगाने शासनाने सर्व महानगरपालिकाना निर्देश दिलेला आहे की, सदर निधी लाभार्थीच्या बँक खाते मध्ये जमा करण्याची सुचना संबंधीतांना देण्यात यावी असे निर्देश असताना हि नगर महानगरपालिकेने सदर प्रकारचे अनुदान फेरीवाले व पथविक्रेतांच्या बँक खात्यात आज पावेतो सहाय्य अनुदान जमा करण्यात आलेले नाही.


तरी आपण वरील बाबींची गांभीर्य पुर्व दखल घेऊन संदर्भीय शासन निर्णयाचे अनुपालन करुन संबंधित फेरीवाले व पथविक्रेतांच्या बँक खात्यामध्ये सहाय्य अनुदान तत्काळ जमा करण्याबाबत योग्य ते निर्देश दयावे अशी मागणी करण्यात आली आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only