Wednesday, May 19, 2021

त्या आरोपींना 22 पर्यंत पोलीस कोठडी


 


नगर दिनांक 19 प्रतिनिधी 


नगर तालुक्यातील हनीट्रप प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना आज त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना दिनांक 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत  ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे, दरम्यान या घटनेचा तपास सध्या सुरू असून आरोपींच्या कबज्यातून  जे काही मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे, त्या संदर्भातील तपास पोलिसांनी सुरू केला असून अनेकांची नावे उजेडात येण्याची शक्यता आहे.


नगर तालुक्यामध्ये जखणगाव येथे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता, या घटनेतील आरोपी संबंधित महिला व अमोल मोरे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात आज  हजर करण्यात आले होते, सरकारी पक्षाच्या वतीने आज या प्रकरणात गांभीर्य लक्षात घेता गुन्हा ची  व्याप्ती मोठ्या प्रमाणावर आहे, यांच्या कबज्यातून मोबाईल हस्तगत केले आहे तसेच यांच्या आवाजाचे नमुने सुद्धा घेण्यात आलेले आहेत ,त्याची तपासणी सुद्धा करायची आहे, तसेच या घटनेमध्ये अन्य कोणाकोणाचा समावेश आहे. याचा सुद्धा पोलीस शोध घेत आहे , यांच्या कडुन जो काही मुद्देमाल हस्तगत केलेला आहे तो केव्हा व कुठून कसा मिळाला याचा शोध पोलिसांना लावायचा आहे त्यामुळे या आरोपींना पोलीस कोठडी मध्ये वाढ करावी असा युक्तिवाद न्यायालयांमध्ये करण्यात आला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दिनांक 22 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


हनी ट्रॅप प्रकरणांमध्ये दुसरा गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. एका शासकीय अधिकाऱ्याला तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला होता. वरील आरोपी नीच् ही खंडणी मागितली होती त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळालेले आहे. विशेष म्हणजे पोलिस तपासामध्ये संबंधित आरोपी मोरे हा घरामध्ये जो कोणी ग्राहक म्हणून येईल त्याची शूटिंग घ्यायचा व त्यानंतर संबंधित महिला व तो त्यांना ब्लॅकमेलिंग करायचा असा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये अन्य काही जणांचा सुद्धा समावेश असण्याची शक्यता आहे ,त्या दृष्टीकोनातून पोलिसांनी त्याचा तपास सुरू केलेला आहे, नगर जिल्ह्यामध्ये हनी ट्रॅप चे प्रकरण मागील वेळेला सुद्धा अशा प्रकारचे घडलेले होते आता त्याचा विषय व हा विषय याचासुद्धा काहीच संबंध आहे का अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे.


या प्रकारनात मध्ये तपासी अधिकारी नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी जे काही आरोपी कडून मोबाइल हस्तगत केले आहेत याचा तपास सध्या पोलिस करत आहे. तसेच ज्या व्यक्तीला तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती त्याने 80 हजार रुपये संबंधित महिलेला दिले असल्याचेही प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे ते नेमके कसे व कुठे दिले गेले याचा पोलिस शोध घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच तीन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये अमोल मोरे तसेच महेश बागुल यांचा समावेश आहे मोरे यांना अटक केलेले आहे  त्यांच्या साथीदारांचा ही पोलिसांनी शोध सुरू केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only