Monday, May 3, 2021

रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्याबाजारात जास्त दराने विक्री करणारी तीन आरोपी वाहन व तीन इंजेक्शन असा एकूण 7 लाख 32 हजार 850 रुपये किमतीचा मुद्देमालासह आरोपी जेरबंद

 नगर दिनांक 3

- रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्याबाजारात जास्त दराने विक्री करणारी तीन आरोपी वाहन व तीन इंजेक्शन असा एकूण 7 लाख 32 हजार 850 रुपये किमतीचा मुद्देमालासह आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला यश आले आहे.हेमंत दत्तत्राय कोहक (रा.बोल्हेगाव), भागवत मधुकर बुधवंत (रा. आदर्श कॉलनी, बोल्हेगाव) आणि आदित्य बाबासाहेब म्हस्के (रा. माताजीनगर, एमआयडीसी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.


याबाबत समजलेली माहिती अशी की, तारडे हॉस्पिटल (बालिकाश्रमरोड अहमदनगर) व काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेज कमान ( एमआयडीसी अहमदनगर) या परिसरात काही इसम हे स्वतःच्या आर्थिक फायदा करिता covid-19 या आजारावर लागणाऱ्या इंजेक्शनची जास्त दराने विक्री करीत आहेत, अशी खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार श्री कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या इसमाचे मिळालेला मोबाईल क्रमांकावर बनावट ग्राहकाच्या मध्यस्थीने संपर्क करून रेमडेसिवीर इंजेक्शनची बाबत विचारपूस केली असता सदर इसमाने एक इंजेक्शन ची किंमत 27 हजार रुपये सांगितली. त्यावेळी सदर इसमास खरेदीसाठी होकार दिला असता, सदर इसमाने दहा ते पंधरा मिनिटांनी तारडे हॉस्पिटल (बालिकाश्रमरोड अहमदनगर) परिसरातील असे सांगितल्याने एलसीबी पथकातील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी बनावट ग्राहक खरेदीसाठी पाठवून दोन पंचासह तारडे हॉस्पिटल (बालिकाश्रमरोड अहमदनगर) या हॉस्पिटलच्या बाहेर सापळा लावून एका इसमास स्कार्पिओ गाडीसह ताब्यात घेतले. त्यास पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच पंच व औषध अन्न प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक विवेक खेडकर यांची ओळख सांगून त्यांनी त्याचे नाव, पत्ता विचारला असता, त्यानी हेमंत दत्तात्रय कोहोक पोळके (वय 21 रा. सनफार्मा स्कूल जवळ बोल्हेगाव अहमदनगर) सांगितले. त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पोलिफॉर्म कंपनीचे एक रेमडेसिवीर इंजेक्शन, एक मोबाईल व स्कॉर्पिओ ( एमएच 14 डीटी 9323) असा एकूण 7 लाख 12 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत चौकशी केली असता, त्याने सदरचे इंजेक्शन हे महेश दशरथ मते (रा. बरबडेवस्ती तपोवनरोड नगर) व प्रदीप मारुती मगर व अमर शिंदे (दोघे रा. तागडवस्ती तपोवनरोड नगर) या या तिघांनी मिळून दिले असल्याचे सांगितले. त्याच्या राहत्या घरी शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही. सदरबाबत औषध निरीक्षक विवेक खेडकर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं 331/2021भादंवि कलम 420 34 सह परिच्छेद 26 औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 सहवाचन कलम 3 (2)(सी) तसेच जीवनावश्यक वस्तूचे अधिनियम 1955चे उल्लंघन दंडनीय कलम 7 (1)(ए) तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 चे कलम 18(सी)चे उल्लंघन दंडणीय कलम 27(बी)(ii) कलम18(ए) व कलम 22(1)(cca)चे उल्लंघन अनुक्रमे 28(ए) व कलम 27 (डी) अन्वये आरोपी हेमंत कोहोक, महेश मते, प्रदीप मगर, अमर शिंदे याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास तोफखाना पोलिस ठाण्यात करण्यात येत आहे.


  यानंतर काकासाहेब म्हस्के कॉलेज परिसरात इंजेक्शनची मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर बनावट ग्राहकाच्या मध्यस्थीने संपर्क करून याबाबत विचारपूस केली असता सदर इसमाने एका रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत 32 हजार रुपये सांगितले. यावेळी सदर इसमाने इंजेक्शन खरेदीसाठी होकार दिला असता, सदर इसमाने दहा ते पंधरा मिनिटांनी काकासाहेब म्हस्के कॉलेज कमान एमआयडीसी परिसरात या असे सांगितल्याने, पथकातील अधिकारी यांनी बनावट ग्राहक खरेदीसाठी पाठवून काकासाहेब म्हस्के हॉस्पिटल कॉलेज कमानीजवळ सापळा लावून दोन इसमांना

ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, भागवत मधुकर बुधवंत ( वय 20 आदर्श काॅलनी बोल्हेगाव अहमदनगर) अदित्य बाबासाहेब म्हस्के ( वय 21, रा. माताजीनगर, एमआयडीसी नगर) असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता दोघांकडे सन फार्मासिटिकल कंपनीचे एक व सिप्ला कंपनीचे एक असे दोन रेमडेसिवीर इंजेक्शन, एक मोबाईल असा एकूण 20 हजार 450 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. आरोपीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत चौकशी केली असता, हे अंकीत कालिका मोर्य (रा. गुरुकृपा काॅलनी, एमआयडीसी, अहमदनगर) याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्या विरुद्ध अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक विवेक खेडकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक अग्रवाल व शहर पोलिस उपअधीक्षक विषाल घुमे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानि

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only