Tuesday, May 11, 2021

45 वर्षाच्या पुढील नागरिकांना आउद्या दिनांक 12 तारखे पासून दिली जाणार डोस

 नगर दि 11 प्रतिनिधी


लस देण्यासाठी सर्वत्र गर्दी होत असते आता त्याची योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी नगर महानगरपालिकेने आता ज्यांना डोस दिला जाणार आहे. त्यांची यादी ही महानगरपालिकेच्या वेबसाईटवर तसेच संबंधित केंद्राबाहेर लावण्याचा निर्णय उद्या दिनांक 12 तारखे पासून घेण्यात आला असल्याची माहिती महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त शंकर गोरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान अशा प्रकारची यादी प्रसिद्ध करणारी ही राज्यातील पहिलीच महानगरपालिका ठरणार आहे.नगर महानगरपालिकेने उद्या दिनांक 12 रोजी कोविशीड  व्यक्तींचा दुसरा डोस पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांना दिला जाणार आहे ,या डोस करिता पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी त्यांनी घेतलेल्या पहिल्या डोसच्या दिनांकानुसार प्राधान्यक्रमाने निश्चित करण्यात आलेली आहे त्याची ही यादी संबंधित आरोग्य केंद्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांचे नाव यादीमध्ये असेल त्यांनी त्या लसीकरण केंद्रावर लसी घेण्या करिता उपस्थित राहायचे आहे इतर नागरिकांना त्यांनी यापूर्वी घेतलेल्या लसीचा डोस या दिनांका प्रमाणेच दुसरा डोसा दिनांक निश्चित करून दिला असाही निर्णय घेतला असल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले, उपलब्धतेनुसार सर्वांचे लसीकरण पूर्ण करून घेतले जाईल तरी नागरिकांनी विनाकारण आरोग्य केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन सुद्धा आरोग्य अधिकारी डॉक्टर बोरगे यांनी केलेले आहे.


तसेच महानगरपालिकेच्या वेबसाईटवर ही यादी प्रसिद्ध केली जाईल असेही आयुक्त यांनी सांगितले. आहे आम्ही ज्या ज्या वेळेला जो डोस देणार आहोत त्याची माहिती आदल्या दिवशी प्रसिद्ध केले जाणार आहे, त्यामुळे इतर नागरिकांनी त्या केंद्रावर जाऊ नये असेही सांगण्यात आले आहे तर दुसरीकडे येत्या दोन दिवसांमध्ये लस संदर्भा मध्ये एक टोल फ्री क्रमांक सुद्धा आम्ही निश्चित करणार आहोत ज्या नागरिकांना चौकशी करायची असेल तर त्यांनी त्या टोल फ्री वर संपर्क साधायचा आहे. नगर शहरामध्ये आम्ही सात केंद्र निश्चित केलेले आहे असे आयुक्त गोरे यांनी सांगितले.


नगर शहरामध्ये तोफखाना आरोग्य केंद्र, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, मुकुंद नगर नागरी आरोग्य केंद्र ,केडगाव नागरी आरोग्य केंद्र ,महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्र, सिव्हिल आरोग्य केंद्र नागापूर आरोग्य केंद्र या ठिकाणी उद्यापासून म्हणजे दिनांक 12 तारखेपासून दुसरा डोस दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


चौकट


लसीकरणाच्या संदर्भामध्ये सर्वत्रच वेगवेगळे विषय होत आहे. आता महानगरपालिकेने यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी पण सुरू झालेली आहे. अशा प्रकारची यादी प्रसिद्ध करण्याची ही पहिलीच राज्यातील महानगरपालिका असणार आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only