Sunday, May 16, 2021

अवघी दोन दिवसाची सवलत...मनपाने केले पुन्हा सर्व बंद किराणा-भाजी मिळण्यास येणार अडचणी, पोलिसांनी घेतलाहोता आक्षेप

 



अवघी दोन दिवसाची सवलत...मनपाने केले पुन्हा सर्व बंद

किराणा-भाजी मिळण्यास येणार अडचणी, पोलिसांनी घेतलाहोता आक्षेप

अहमदनगर/प्रतिनिधी- अत्यावश्यक सेवेतील दूध विक्री वमेडिकलसह किराणा व भाजीपाला व पशुखाद्य विक्रीला मुभा देणारा निर्णय महापालिकाआयुक्त शंकर गोरे यांनी अवघ्या दोन दिवसात मागे घेतला आहे. त्यामुळे शनिवारी (15मे) व रविवारी (16 मे) सकाळी 7 ते 11 या दरम्यान उघडलेली किराणा दुकाने वरस्त्यांवर झालेली भाजी विक्री तसेच मांस विक्री आता सोमवारपासून (17 मे) पुन्हाबंद झाली आहे. या दोन दिवसात बाजारात झालेल्या गर्दीमुळे कोरोना संसर्गवाढीचा धोका असल्याचा दावा पोलिसांनी केल्याने आयुक्त गोरे यांनी पुन्हादूधविक्री, पशुखाद्य व बी-बियाणे आणि खते विक्री तसेच मेडिकल वगळता अन्य सर्वआस्थापना बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.




पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना संसर्गरोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील दूध विक्री व मेडिकल दुकाने वगळता अन्यआस्थापना बंद करण्याचे सुचवले होते. त्यानुसार आयुक्त गोरे यांनी पहिल्याटप्प्यात 2 ते 10 व नंतर दुसर्‍या टप्प्यात 11 ते 14 या कालावधीत फक्त दूधविक्री व मेडिकल दुकानांना परवानगी दिली होती. त्यामुळे या काळात किराणादुकाने, भाजीपाला-फळे विक्री, पशुखाद्य विक्री, मांस विक्री बंद राहिली.नागरिकांचे त्यामुळे हाल झाले. शिवाय महापालिकेने नागरिकांना किराणा व भाजीपालाघरपोहोच मिळण्यासाठीही काही सुविधा केली नव्हती. त्यामुळे गरजवंत नागरिकांनाचोरीछुपे किराणा व भाजीपाला घ्यावा लागला व तोही वाढीव भावाने मिळतअसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसला. या पार्श्‍वभूमीवर 14 मे रोजी आयुक्तगोरे यांनी निर्बंध शिथील केले व सकाळी 7 ते 11 या वेळेत किराणा दुकाने,भाजीपाला-फळे विक्री, पशुखाद्य दुकाने व मांस विक्रीला मुभा दिल्याने शनिवारी (15मे) व रविवारी (16 मे) नागरिकांसह व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला. पण आता पुन्हापहिल्यासारखे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. अर्थात यातून पशुखाद्य विक्री व खते तसेचबी-बियाणे विक्रीला सकाळी चार तासांसाठी परवानगी दिली गेली आहे.




पोलिसांनी घेतला होता आक्षेप




कृषी निविष्ठा केंद्रांवर खरेदीसाठी शेतकर्‍यांंची गर्दीटाळण्याच्या अनुषंगाने शेतीशी निगडीत असलेले शहर हद्दीतील कृषी सेवा केंद्रचालू ठेवण्याबाबत व त्यांच्याशी निगडीत उत्पादन व वाहतूक सकाळी 7 तेसायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची विनंती केल्याने 15 मे सकाळी 7 वाजेपासूनते 24 रोजीचे सकाळी 7 वाजेपर्यंतच्या काळासाठी निर्बंधामध्ये अंशतः बदल करुनवेळेचे निर्बंध लागू करण्यात आले होते. पण पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आक्षेपघेतल्याने तसेच आयुक्त गोरे यांना पत्र देऊन कृषीविषयक दुकाने (विक्री दुकाने),माल वाहतूक, भाजीपाला वाहतुकीबाबत नवीन दिलेल्या सवलतीमुळे या आस्थापनांवर गर्दी होऊनकोविड-19चे संक्रमण वाढेल व त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होणारअसल्याचा दावा करून सवलतीचे आदेश रद्द करण्याचे सुचवल्याने आयुक्त गोरे यांनीदिलेली सवलत काहीअंशी रद्द करून पुन्हा नव्याने निर्बंध जारी केले आहेत.




नगरकरही जबाबदार ठरले




आयुक्त गोरे यांनी वेळेचे बंधन घालून किराणा,भाजीपाला-फळे विक्री, पशुखाद्य विक्री व मांस विक्रीला परवानगी दिल्यावरनगरकरांनीही जबाबदारीने न वागता बाजारात गर्दी केल्याने पुन्हा निर्बंध लागू करण्याचीवेळ मनपावर आली. 15 व 16 रोजी शहरामध्ये भाजीपाला, किराणा व अत्यावश्यकवस्तु खरेदी-विक्री करण्यासाठी नागरिकांची मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे कोरोना विषाणू-19चा प्रादुर्भाववाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सवलतीचा आदेशरद्द करण्यात येत असून, हे आदेश आता 16 मे पासून 1 जूनरोजी सकाळी 7 वाजेपर्यंत जारी असणार आहेत.




-चौकट-1




या आस्थापनांना सवलत




-वैद्यकीय सेवा व औषध दुकाने सुरू राहतील.


-अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप नियमित वेळेनुसारसुरू राहतील.


-घरपोहोच गॅस वितरण सेवा सुरु राहील.


-सर्व बँका सुरू राहतील.


-दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री फक्त सकाळी 7 ते 11 सुरूराहील.


-पशुखाद्य विक्री सकाळी 7 ते 11 सुरू राहील. 


-बी-बियाणे, खते व कीटकनाशक दुकाने सकाळी 7 ते 11सुरू राहतील. 






--चौकट-2




या आस्थापनांना बंदी




-किराणा दुकाने व तदनुषंगिक मालाची खरेदी-विक्री करणेबंद राहील.


-भाजीपाला व फळे बाजारमालाची खरेदी-विक्री करणे बंद राहील.


-सर्व खासगी आस्थापना पूर्णत: बंद राहतील. 


- अंडी, मटन, चिकन व मत्स्य विक्री बंद राहील.


-शेतीशी निगडीत मशिनरी, पंप इत्यादी दुकाने बंद राहतील.- या आदेशांचे उल्लघंन केल्यास दंडनीय व कायदेशीरकारवाईस पात्र राहतील

  1. ही फक्त आयुक्त साहेब ची हुकूशाही

    ReplyDelete

Whatsapp Button works on Mobile Device only