Tuesday, May 18, 2021

शरिरसंबधाचे आमीष दाखवुन अश्लील व्हीडीओ बनवुन धमकी देवुन 3 कोटींची मागणी

दिनांक १८/०५/२०२१ शरिरसंबधाचे आमीष दाखवुन अश्लील व्हीडीओ बनवुन धमकी देवुन 3 कोटींची मागणी करणारे अटक . दि . 18/05/2021 रोजी नगर तालुका पो.स्टे 1 गुरनं 243 2021 भादवि कलम 394,397,385,120 ( ब ) , 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदर गुन्ह्यात दि .01 / 05 / 2021 रोजी या गुन्ह्यातील आरोपींनी संगणमत करुन शरिरसंबधाचे अमिष दाखवून त्यांचेतील महिलेसोबत शरिरसंबध ठेवणेस भागपाडुन त्याचे अश्लील व्हीडीओ बनवला होता.आम्हास 3 कोटी रुपये आणुन दे नाहीतर सदर अश्लील व्हीडीओ हा पोलीसांना दाखवुन तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी सदर गुन्ह्यातील आरोपांनी दिली होती.सदर वेळी फीयादीच्या गाडीच्या डिक्कीत असणारे 30000 रुपये रोख व ऑनलाईन 50000 रुपये त्यांच्या नातेवाईकाच्या खात्यावर बळजबरीने खात्यावर वर्ग करुन घेतले सदर गुन्ह्याचा तपास मा.पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील पो . व मा अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सो . मा उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील सो यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेन्द्र सानप नगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत . आज दि .18 / 05 / 2021 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप यांनी पोलीस पथकासह हमीदपुर येथे राहणारा आरोपी नामे सचिन भिमराज खेसे यास ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता सदरचा गुन्हा हा त्याने व त्याचे साथीदार महिला व तिचे साथीदार अमोल सुरेश मोरे रा.कायनेटीक चौक अहमदनगर महेश बागले रानालेगाव , लागर खरमाळे रानालेगाव यांना सोबत घेवुन केल्याची कबुली दिली असता सदर आरोपीनी फिर्यादीस चाकुचा धाक दाखवुन बांधन घालुन मारहाण करन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवुन 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती , व एकुन 80000 / जबरदस्तीने लुबाडले होते.यापैकी तिन आरोपी अटक असुन सागर खरमाळे व महेश बागले यांचा शोध सुरु आहे . सदर आरोपीन्नो आणखी कोणास यापद्धतीने अमीष दाखवुन लुबाडले असले बाबत तपास सुरु आहे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अशा प्रकारे शरिरसंबधाचे अमिष दाखवुन अश्लील कोडीओ बनवुन त्याची धमकी देवुन लुट झाल्यास अथवा पैशांची मागणी केली असल्यास तात्काळ पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्याचे आवाहन मा.पोलीस अधिक्षक श्री.मनोज पाटील सो.यांनी केले आहे . सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सो . व मा.अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सो . मा.उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील सो , यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप व पथकातील पो उप.नि. आर एन राऊत , धनराज जारवाल , पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे , संतोष लगड , पो.ना योगेश ठाणगे , भानुदास सोनवणे पो.कॉ धर्मराज दहिफळे , संभाजी बोराडे यांनी सदरची कारवाई केली असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप हे करत आहेत .

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only