Friday, May 21, 2021

पंढरपुर, जिल्हा सोलापुर येथे हत्येचा प्रयत्न करुन, फरार झालेले सराईत गुन्हेगार अहमदनगर शहरातुन जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 पंढरपुर, जिल्हा सोलापुर येथे हत्येचा प्रयत्न करुन, फरार झालेले सराईत गुन्हेगार अहमदनगर शहरातुन जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


फिर्यादी श्री. शिवा रामा इंदापुरकर, वय २२ वर्षे, धंदा मजुरी, रा. डोंबेगल्ली, ता. पंढरपुर, जिल्हा सोलापुर यांचे आरोपी नामे आण्णा डांगे, सुरज गंगेकर, अभिषेक गंगेकर व त्यांचे इतर साथीदारां सोबत मागिल दोन महिन्यापुर्वी भांडण झाले होते. त्या बाबत फिर्यादी यांनी पंढरपुर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली होती. त्या तक्रारीचा राग मनात धरुन आरोपी आरोपी नामे १) अभिषेक गंगेकर, पंढरपुर, जिल्हा सोलापुर, २) विवेक गंगेकर पंढरपुर, जिल्हा सोलापुर व त्यांचे इतर साथीदारांनी फिर्यादी यांना कोयता व स्टम्पने मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी पंढरपुर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र.नं. I २९५ / २०२१ भादविक ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे दिनांक १६/०५/२०२१ रोजी दाखल करण्यात आला होता.


सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हयातील मुख्य आरोपी हे फरार झाले होते. सदर फरार आरोपी हे अहमदनगर शहरामध्ये मंगलगेट परिसरात त्यांचे नातेवाईकांकडे आले असल्या बाबत श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गोपनिय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सफौ/ सोन्याबापु नानेकर, पोहेकॉ/ संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी, संदीप पवार, सचिन अडवल, रवि सोनटक्के, पोकॉ/ आकाश काळे, जालिंदर माने, रोहित मिसाळ व चापोना / भरत बुधवंत अशांनी मिळुण मंगलगेट परिसरामध्ये जावुन आरोपींचे माहिती घेवुन दोन इसमांना ब्रिझा कार नं. एमएच २६ / बीसी/४७३७ सह ताब्यात घेतले. त्यांना पोलीस स्टाफची ओळख सांगुन त्यांची नाव व पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अभिषेक ऊर्फ निखील प्रताप गंगेकर, वय २६, रा. मु.पो. अनिलनगर, ता. पंढरपुर, जिल्हा सोलापुर, २) विवेक नागेश गंगेकर वय २४ रा. मु.पो. जुनीपेठ, काशीकापडे गल्ली, ता. पंढरपुर, जिल्हा सोलापुर असे असल्याचे सांगितले. सदर आरोपी हे वरील नमुद गुन्हयात फरार असल्याने त्यांना ताब्यात घेवुन पंढरपुर शहर पोलीस स्टेशनचे सपोनि आर. ए. मगदुम यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील


कार्यवाही पंढरपुर शहर पोलीस स्टेशन करीत आहे. वरील नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुद यापुर्वी पंढरपुर शहर पोलीस स्टेशन येथे शासकिय कामामध्ये अडथळा आणणे, हत्येचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, गंभीर दुखापती करणे, बेकायदेशिर जमाव जमविणे अशा प्रकारचे प्रत्येकी चार ते पाच गुन्हे दाखल आहे.


सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटिल साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सौरभ कूमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only