Saturday, May 29, 2021

नगर जिल्ह्याला पुरेसा लसीचा साठा उपलब्ध करून द्या- आ. संग्राम जगताप आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी नगर जिल्ह्याला पुरेसा लसीचा साठा उपलब्ध करून द्या- आ. संग्राम जगताप


आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


अहमदनगर प्रतिनिधी- नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे महाभयंकर संकट आले होते त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे यासाठी नगर जिल्ह्याला लवकरात-लवकर लसीकरणाचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आ.संग्राम जगताप यांनी केली.यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, आयुक्त शंकर गोरे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, विनित पाऊलबुधे, मर्चंट बॅंकेचे संचालक संजय चोपडा आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना आमदार संग्राम जगताप यांना नगर शहरात कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपण करत असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली तसेच लहान मुलांसाठी धोक्याचे असलेले तिसऱ्या लाटे साठी नगर शहरातील बालरोग समितीच्या माध्यमातून करत असलेल्या उपाय योजना संदर्भात माहिती दिली. मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्याला लसीचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की,कोरोनाचे संकट सर्वांच्या सहकार्यातून हद्दपार करायचे आहे, यासाठी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सरकारच्या वतीने सर्व आरोग्य सुविधा पुरवण्याची ग्वाही दिली.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only